१ करिंथकर ६:९-११ |
[९] अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,[१०] चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही[११] आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत. |
|
१ करिंथकर १०:१३ |
लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील. |
|
रोमन्स 1:20 |
सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये! |
|
फिलिपीन्स ४:१९ |
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. |
|
२ तीमथ्य ३:१६ |
प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे. |
|
लूक 23:34 |
[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.] |
|
लूक ११:११ |
तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? |
|
१ करिंथकर ६:९ |
अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन, |
|
जॉन १:८ |
तो स्वतः प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला होता. |
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |