A A A A A

गणित चिन्हे: [संख्या ५]


प्रकटीकरण १३:५-१८
[५] देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता.[६] त्याने देवनिंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास सुरुवात केली.[७] पवित्र लोकांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. सर्व वंश, लोक, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.[८] जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.[९] ज्या कोणाला कान आहेत, त्याने ऐकावे.[१०] कैदेत नेणारा कैदेत जातो, जो तलवारीने ठार मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे म्हणून पवित्र लोकांना धीर व विश्वास मिळतो.[११] नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते.[१२] ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते.[१३] ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले.[१४] जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.[१५] पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.[१६] लहानथोर, गरीब व श्रीमंत, स्वतंत्र व दास ह्या सर्वानी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी[१७] आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे दडपण त्याने सर्व लोकांवर आणले.[१८] येथे सुज्ञतेचे काम आहे, ज्याला समज आहे, त्याने श्वापदाच्या संख्येचा अर्थ शोधून काढावा कारण संख्या माणसाच्या नावाचा बोध करते. त्याची संख्या सहाशे सहासष्ट आहे.

मॅथ्यू 19:9
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”

प्रकटीकरण ११:२-३
[२] मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील.[३] मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.”

मॅथ्यू ५:३२
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.

२ तीमथ्य ३:१६
प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे.

प्रकटीकरण 4:6-8
[6] तसेच राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजासनाभोवती चार बाजूंस चार प्राणी होते. त्यांना पुढे व मागे अंगभर डोळे होते.[7] पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.[8] त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत.

१ करिंथकर १०:१३
लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India