A A A A A

जीवन: [सौंदर्य]


१ पीटर 3:3-4
[3] तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे,[4] उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.

२ करिंथकर ४:१६
म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे

इफिसियन्स २:१०
आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.

फिलिपीन्स 4:8
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.

रोमन्स 8:6
दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे.

मॅथ्यू ६:२८-२९
[२८] तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत.[२९] तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता!

१ तीमथ्य २:९-१०
[९] तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,[१०] तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे.

गलतीकर ३:२६-२७
[२६] तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात.[२७] तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला जणू परिधान केले आहे.

जेम्स ๑:๒๓
जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे.

मॅथ्यू २३:२८
तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India