A A A A A

चांगले पात्र: [धैर्य]


कायदे ४:२९-३१
[२९] तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा[३०] आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”[३१] त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.

२ करिंथकर ३:१२
आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो.

कायदे १४:३
ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. प्रभूनेदेखील त्याच्या कृपेच्या वचनाचे समर्थन केले म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भूत कृत्ये होऊ दिली.

कायदे १३:४६
परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो;

कायदे १९:८
पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला.

फिलेमोन १:८
ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते.

कायदे १८:२६
तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.

मार्क १५:४३
म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.

कायदे २८:३१
तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.

कायदे ४:२९-३०
[२९] तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा[३०] आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”

इफिसियन्स ३:१२
ख्रिस्तामध्ये श्रद्धेद्वारे आत्मविश्वासाने व खातरीने परमेश्वराच्या सहवासात प्रवेश मिळविण्याचे धैर्य आपल्याला मिळाले आहे.

जॉन ४:१७
ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “‘मला पती नाही’, हे तू खरे बोललीस,

इब्री १०:१९
म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्‍वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे.

इब्री ४:१६
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.

इब्री १३:६
म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणू या, प्रभू माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?

इफिसियन्स ६:१९-२०
[१९] जेव्हा मी संदेश देण्यासाठी उभा राहीन, तेव्हा देवाने मला त्याचा संदेश द्यावा म्हणजे धैर्याने मला शुभवर्तमानाचे रहस्य लोकांना कळविता यावे, म्हणून माझ्यासाठीही प्रार्थना करा.[२०] जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा.

कायदे 4:13
पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले.

१ तीमथ्य ३:१३
जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.

१ थेस्सलनीकाकर २:२
पूर्वी फिलिप्पै येथे आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, तीव्र विरोधाला तोंड देत असतानाही देवाचे शुभवर्तमान तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले, हे तुम्हांला माहीतच आहे.

फिलिपीन्स १:२०
***

२ तीमथ्य १:७
कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे.

१ करिंथकर १६:१३
सावध असा, विश्वासात स्थिर राहा, निर्भय बना, सशक्त व्हा.

रोमन्स १:१६
मला शुभवर्तमानाची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी, म्हणजेच प्रथम यहुदी व नंतर यहुदीतर माणसांसाठीदेखील, ते देवाचे तारणदायक सामर्थ्य आहे.

१ करिंथकर १५:५८
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, स्थिर आणि अढळ राहा. प्रभूच्या कार्यात सतत मग्न राहा; कारण तुम्ही जाणून आहात की, प्रभूमध्ये तुम्ही केलेले श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत.

इफिसियन्स ६:१०
शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.

जॉन १४:२७
मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका.

मार्क ५:३६
परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्‍त विश्वास ठेव.”

फिलिपीन्स १:२८
विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे.

जॉन ७:२६
पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय?

कायदे ५:२९
परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.

कायदे ९:२९
तो ग्रीक भाषिक यहुदी लोकांबरोबरही चर्चा व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले.

फिलिपीन्स १:१
फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:

१ तीमथ्य ३:१
कोणी ख्रिस्तमंडळ्यांमध्ये बिशप होऊ पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन सत्य आहे.

१ करिंथकर ३:१२
ह्या पायावर जो तो सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत किंवा पेंढा ह्यांनी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बांधकाम करतो आहे

इब्री १०:१
तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून नियमशास्र प्रतिवर्षी अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी देवाजवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.

१ पीटर ५:१०
आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India