A A A A A

देव: [शाप]


गलतीकर ३:१३
आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे.

लूक ६:२८
जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

गलतीकर ५:१
स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्‍त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.

२ करिंथकर ५:१७
जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल, तर तो नवी निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, सर्व काही नवीन झाले आहे.

१ योहान ४:४
मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.

रोमन्स ८:३७-३९
[३७] उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो![३८] कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी,[३९] उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.

१ पीटर ५:८-९
[८] सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.[९] त्याच्याविरुद्ध दृढ विश्वासाने असे उभे राहा, कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.

इफिसियन्स ६:१०-१७
[१०] शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.[११] सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्रसामग्री धारण करा;[१२] कारण आपले युद्ध मानवी शक्तीबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर व अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे.[१३] तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.[१४] आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा,[१५] शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा[१६] आणि जिच्यायोगे त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल नेहमी जवळ बाळगा.[१७] तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हाती घ्या.

मॅथ्यू ५:२२
मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याच्या भावावर विनाकारण रागावेल, त्याचा न्याय केला जाईल. जो कोणी त्याच्या भावाला, “अरे मूर्खा’, असे म्हणेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. तसेच जो कोणी त्याला ‘अरे महामूर्खा’, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

रोमन्स ३:२३
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत.

रोमन्स ६:२३
पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.

रोमन्स १२:१४
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India