A A A A A

देव: [आज्ञा]


मार्क 10:19
तुला आज्ञा ठाऊक आहेत:खून करू नकोस; व्यभिचार करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; फसवू नकोस; आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख.”

लूक १८:२०
तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.”

मॅथ्यू २२:३४-४०
[३४] येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले.[३५] त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले,[३६] “गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?”[३७] येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’[३८] ही महान व पहिली आज्ञा आहे.[३९] हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’[४०] ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”

रोमन्स १३:९
व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात सामावलेला आहे.

मॅथ्यू १९:१६-१९
[१६] एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्‍वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”[१७] तो त्याला म्हणाला, “चांगले म्हणजे काय ह्याविषयी मला का विचारतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”[१८] तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,[१९] तुझ्या वडिलांचा व तुझ्या आईचा सन्मान कर आणि जशी स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”

मॅथ्यू २२:३६-४०
[३६] “गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?”[३७] येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’[३८] ही महान व पहिली आज्ञा आहे.[३९] हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’[४०] ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”

मॅथ्यू १०:१७-२२
[१७] माणसांच्या बाबतीत जपून राहा. ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांच्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील.[१८] तुम्हांला माझ्यामुळे सत्ताधिकारी व राजे ह्यांच्यापुढे खटल्यासाठी नेण्यात येईल, तेव्हा तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष देऊ शकाल.[१९] जेव्हा तुम्हांला त्यांच्यापुढे नेतील, तेव्हा कसे बोलावे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका. ते तुम्हांला त्याच वेळी सुचवले जाईल.[२०] कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलणारा आहे.[२१] भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील.[२२] माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल.

रोमन्स 13:8-14
[8] एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.[9] व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात सामावलेला आहे.[10] प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.[11] समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे.[12] रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.[13] दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत.[14] परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका.

मार्क १२:२८-३४
[२८] त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”[२९] येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे.[३०] तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’[३१] दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”[३२] तो शास्त्री म्हणाला, “गुरुवर्य, आपण ठीक बोललात. परमेश्वर एक आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही.[३३] तसेच संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ ह्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.”[३४] त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून येशूला आणखी काही विचारण्याचे धाडस कुणाला झाले नाही.

जॉन १४:१५
माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.

मॅथ्यू १९:१८
तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,

जॉन 15:10
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.

मॅथ्यू ५:१७
नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ नष्ट करायला मी आलो आहे, असे समजू नका; मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे.

जॉन १५:१२-१७
[१२] माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा.[१३] आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही.[१४] तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात.[१५] मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे.[१६] तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.[१७] तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India