लूक ६:३८ |
द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने तुम्हांला परत देण्यात येईल. |
|
मॅथ्यू ५:४ |
जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. |
|
फिलिपीन्स ४:१९ |
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. |
|
फिलिपीन्स 4:6-7 |
[6] कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.[7] म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील. |
|
जेम्स 1:17 |
दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते. |
|
जॉन 1:16 |
त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. |
|
१ योहान ५:१८ |
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही. |
|
२ करिंथकर ९:८ |
सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे. |
|
फिलिपीन्स ४:७ |
म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील. |
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |