A A A A A

चर्च: [चर्च छळ]


कायदे ८:१
शौलाला तर स्तेफनचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेम येथल्या मंडळींचा फार छळ झाला. प्रेषितांखेरीज इतर सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली.

मॅथ्यू ५:४४
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

२ तीमथ्य ३:१२
ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल

जॉन १५:२०
दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील,

प्रकटीकरण २:१०
तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुगांत टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हांला हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.

रोमन्स ८:३५
तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय?

मॅथ्यू ५:११
माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.

रोमन्स १२:१४
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका.

जॉन ५:१६
त्यामुळे ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने साबाथ दिवशी हे काम केले होते.

मॅथ्यू ५:१०-१२
[१०] नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.[११] माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.[१२] आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.

२ करिंथकर १२:१०
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.

कायदे १३:५०
यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले.

कायदे ७:५२
ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात.

मार्क ४:१७
पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात.

गलतीकर ४:२९
त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला आणि आत्ताही तसा होत आहे.

मार्क १०:३०
अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल.

मॅथ्यू १३:२१
परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो.

कायदे २२:४
पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला.

मॅथ्यू ५:१०
नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

गलतीकर ६:१२
जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.

लूक २१:१२
परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील.

मार्क १०:२९-३०
[२९] येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे,[३०] अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल.

रोमन्स ८:३५-३७
[३५] तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय?[३६] धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते.[३७] उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो!

कायदे ११:१९-२१
[१९] स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते.[२०] परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले.[२१] त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते.

कायदे ९:४-५
[४] तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?”[५] तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे,

गलतीकर ५:११
बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता.

मॅथ्यू १०:२३
जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.

मॅथ्यू ५:१२
आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.

१ तीमथ्य १:१३
जरी मी पूर्वी अपप्रचार करणारा, छळ करणारा व हिंसक होतो, तरी मी जे केले, ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून देवाने माझ्यावर दया केली.

मॅथ्यू ५:११-१२
[११] माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.[१२] आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.

लूक ११:४९
ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’

१ थेस्सलनीकाकर ३:३-४
[३] तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.[४] आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.

इब्री ११:३६-३८
[३६] काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला;[३७] त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते;[३८] त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.

जॉन १५:२०-२१
[२०] दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील,[२१] परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.

मॅथ्यू १०:२१-२३
[२१] भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील.[२२] माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल.[२३] जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.

मॅथ्यू २४:८-१०
[८] हा तर वेदनांचा प्रारंभ असेल.[९] तेव्हा तुमचे हाल करण्याकरता तुम्हांला धरून नेण्यात येईल व तुम्हांला ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील.[१०] त्या वेळी पुष्कळ जण श्रद्धेपासून ढळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील.

लूक २१:१२-१९
[१२] परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील.[१३] ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल.[१४] त्या वेळी उत्तर कसे द्यावे, ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा.[१५] मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.[१६] आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील. तुमच्यांतील कित्येकांना ठार मारतील.[१७] माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील.[१८] तरीदेखील तुमच्या डोक्यावरचा एक केसही गळणार नाही.[१९] टिकून राहा म्हणजे तुम्ही स्वतःचा बचाव कराल.

१ करिंथकर ४:८-१३
[८] तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्ही जरी राजे झालो नसलो, तरी तुम्ही मात्र राजे झाला आहात काय? तुम्ही राजे बनलाच असता, तर ठीक झाले असते; कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.[९] मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना सर्वात शेवटच्या स्थानी जणू काही मरणदंडासाठी पुढे केले आहे. कारण आम्ही जगाला, देवदूतांना व माणसांना, जाहीर प्रदर्शन असे झालो आहोत![१०] आम्ही ख्रिस्ताकरिता मूर्ख, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत शहाणे, आम्ही अशक्त, परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत सशक्त, आम्ही अप्रतिष्ठित परंतु तुम्ही प्रतिष्ठित असे आहात![११] ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत. आम्हांला मारहाण होते, आम्हांला घरदार नाही.[१२] आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो.[१३] आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही जगाचा केरकचरा, अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत.

इब्री १०:३२-३४
[३२] पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला.[३३] कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली.[३४] बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.

इब्री ११:३३-३८
[३३] त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली,[३४] अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली.[३५] स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या.[३६] काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला;[३७] त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते;[३८] त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.

कायदे १२:१-१९
[१] ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला.[२] योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले.[३] ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.[४] त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे सादर करावे, असा त्याचा बेत होता.[५] ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती.[६] हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते.[७] अचानक, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या खांद्यावर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर उठ.” तत्क्षणी त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले.[८] देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.”[९] तो निघून त्याच्यामागे गेला. तरी देवदूताने जे केले ते खरोखर घडत आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. आपण दृष्टान्त पाहत आहोत, असे त्याला वाटले.[१०] नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते शहरात जाण्याऱ्या लोखंडी दरवाज्याजवळ आल्यावर तो त्यांच्यासाठी आपोआप उघडला गेला. ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यावरून चालून गेले, तोच देवदूत पेत्रला सोडून गेला.[११] पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”[१२] हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते.[१३] तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.[१४] तिने पेत्राचा आवाज ओळखला आणि तिला इतका आनंद झाला की, दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सर्वांना सांगितले, “पेत्र दाराशी उभा आहे.”[१५] त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.”[१६] पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले![१७] त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला.[१८] दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली.[१९] हेरोदने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर हेरोद यहुदियातून निघून कैसरियात जाऊन राहिला.

कायदे ९:१-१४
[१] दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते.[२] त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे.[३] तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला.[४] तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?”[५] तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे,[६] ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”[७] त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांना कोणी दिसले नाही.[८] शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले.[९] तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा होता व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.[१०] इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?”[११] प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे,[१२] आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.”[१३] हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे[१४] आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.”

गलतीकर १:१३
यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या ख्रिस्तमंडळीचा निष्ठुरपणे छळ करत असे व तिचा विध्वंस करत असे.

प्रकटीकरण २:८-१०
[८] स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पहिला व शेवटचा, जो मरण पावला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो -[९] तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.[१०] तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुगांत टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हांला हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.

कायदे २६:९-११
[९] मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात[१०] आणि तसे मी यरुशलेममध्ये केलेसुद्धा. मी मुख्य याजकांकडून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले आणि त्यांचा वध होत असताना मी संमती दिली.[११] सभास्थानात वारंवार शासन करून मी त्यांना देवनिंदा करावयास लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांच्यावर अतिशय क्रोधाविष्ट होऊन परक्या शहरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.

१ करिंथकर ४:१२
आम्ही आपल्याच हातांनी काम करून थकतो. आम्हांला शाप दिले असता आम्ही आशीर्वाद देतो. आमचा छळहोत असता, आम्ही तो सहन करतो.

कायदे १२:१
ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला.

फिलिपीन्स ३:६
आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India