A A A A A

वाईट वर्ण: [कटुता]


कायदे 8:23
तुझ्यात कटू मत्सरभावना आहे आणि तू पापाच्या बंधनात आहेस, असे मला दिसते.”

कलस्सियन ३:८-१३
[८] परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत.[९] एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या सवयींसह काढून टाकले आहे.[१०] ज्याला त्याचा निर्माणकर्ता देव त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे सातत्याने नवीन करीत आहे, असा नवा मनुष्य तुम्ही धारण केला आहे. ज्यामुळे तुम्हांला त्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे.[११] परिणामी, ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, रानटी व स्कुथीपंथीय, गुलाम व स्वतंत्र असा भेद उरला नाही. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वांत आहे.[१२] तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणा, चांगुलपणा, लीनता, सौम्यता व सहनशीलता हे सारे धारण करा.[१३] एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी.

इफिसियन्स ४:२६
तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या.

मार्क ११:२५
आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील.

रोमन्स 3:14
त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे.

मॅथ्यू ६:१४-१५
[१४] जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील.[१५] परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

जेम्स 1:19-20
[19] माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा.[20] कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही.

इब्री 12:14-15
[14] सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा;[15] देवाच्या कृपेकडे पाठ फिरवू नका. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कटुतेचे मूळ अंकुरित झाल्यावर उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावसारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या.

इफिसियन्स 4:31-32
[31] प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा.[32] उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India