A A A A A

वाईट वर्ण: [विश्वासघात]


मॅथ्यू २७:३-४
[३] येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला,[४] “मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.”

मॅथ्यू ६:१४-१५
[१४] जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील.[१५] परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

मार्क ११:२५
आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील.

मॅथ्यू ७:१२
लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात.

इब्री ४:१५
आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.

रोमन्स ३:२३
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India