A A A A A

अतिरिक्त: [विपुलता]


१ तीमथ्य ५:८
परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.

२ करिंथकर ९:८
सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे.

इफिसियन्स ३:२०
आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांच्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने सिद्धीस न्यावयास जो समर्थ आहे,

जेम्स १:१७
दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते.

जॉन १०:१०
चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन व तेही परिपूर्ण जीवन मिळावे म्हणून आलो आहे.

लूक ६:३८
द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने तुम्हांला परत देण्यात येईल.

लूक ६:४५
चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे, ते मुखावाटे निघणार.

मॅथ्यू ६:३३
तर मग तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टीदेखील तुम्हांला मिळतील.

फिलिपीन्स ४:१९
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.

रोमन्स 15:13
आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India