A A A A A

गणित चिन्हे: [संख्या ७]


२ राजे ५:१०
अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.”

अनुवाद ५:१२
तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे.

निर्गम २२:३०
तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथमवत्स मला द्यावेत; सात दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे; आठव्या दिवशी तू तो मला द्यावास.

जॉन 6:35
येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.

मॅथ्यू 26:26
मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.”

नंबर 4:7
समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे प्याले ठेवावेत; निरंतरची भाकरही त्यावर ठेवावी;

यहोशवा 6:3-4
[3] तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा.[4] सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.

उत्पत्ति २:१-३
[१] ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्वकाही सिद्ध झाले.[२] देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.[३] देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.

उत्पत्ति ९:१२-१६
[१२] देव म्हणाला, “माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असणार्‍या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या, युगानुयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे:[१३] मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल.[१४] मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल,[१५] तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही.[१६] धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्‍या कराराचे मला स्मरण होईल.”

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India