A A A A A

जीवन: [वृद्ध होणे]


१ तीमथ्य ५:८
जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.

२ करिंथकर ४:१६
म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.

अनुवाद ३२:७
पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.

अनुवाद ३४:७
मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती.

उपदेशक ७:१०
“ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.

निर्गम २०:१२
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.

उत्पत्ति ६:३
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.”

उत्पत्ति २५:८
अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.

यशया ४०:२९
तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.

यशया ४६:४
तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.

जॉब ५:२६
हंगामाच्या वेळी, धान्याची सुडी आणून ठेवतात, तसा तू पुर्‍या वयाचा होऊन कबरेत जाशील.

जॉब १२:१२-२०
[१२] वृद्धाच्या ठायी ज्ञान असते; दीर्घायू मनुष्याच्या ठायी समज असते.[१३] त्याच्या2 ठायी ज्ञान व बल आहेत; युक्ती व समज ही त्याचीच आहेत.[१४] पाहा, तो जे मोडतो ते पुन्हा उभारता येत नाही; त्याने एखाद्याला बंधनात ठेवले तर त्याला कोणाच्याने खुले करवत नाही.[१५] पाहा, तो जलवृष्टी आवरतो आणि सर्व पाणी आटून जाते; ती तो सोडतो आणि तिच्यामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होते.[१६] सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.[१७] तो राजमंत्र्यांना अनवाणी घेऊन जातो; तो न्यायाधीशांना मूढ ठरवतो.[१८] तो राजांची सत्ता मोडतो, त्यांच्या कंबरेस बंधन लावतो.[१९] तो याजकाला अनवाणी घेऊन जातो, स्थिरपदी असलेल्यांना तो उलथून टाकतो.[२०] तो भरवशाच्या मनुष्याची तोंडे बंद करतो, वृद्धांचा विवेक हरण करतो.

जॉब ३२:७
मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल सांगावी;

जोएल २:२८
ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.

लेवीय १९:३२
पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.

फिलेमोन 1:9
तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,

स्तोत्र 71:9
उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.

स्तोत्र 71:18
मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.

स्तोत्र ७३:२६
माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.

स्तोत्र ९०:१०-१२
[१०] आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.[११] तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे?[१२] ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.

स्तोत्र ९१:१६
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.

नीतिसूत्रे १७:६
पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;

नीतिसूत्रे २०:२९
बल हे तरुणांना भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.

नीतिसूत्रे २३:२२
तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.

स्तोत्र ३७:३५
मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला;

१ इतिहास २९:२८
आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला.

१ राजे ३:१४
तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.”

स्तोत्र १०३:५
तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.

टायटस २:३
तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात; सुशिक्षण देणार्‍या असाव्यात;

१ तीमथ्य ५:१-२
[१] वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.[२] तरुणांना बंधूसमान मानून, वडील स्त्रियांना मातांसमान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानून बोध कर.

स्तोत्र ७१:८-९
[८] माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.[९] उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.

फिलिपीन्स ३:२०-२१
[२०] आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;[२१] ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.

यशया ४६:३-४
[३] “याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोकहो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले; उदरात होता तेव्हापासून तुम्हांला मी वागवले; माझे ऐका.[४] तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.

स्तोत्र ९२:१२-१५
[१२] नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.[१३] जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.[१४] वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;[१५] ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.

उपदेशक १२:१-७
[१] आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.[२] त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.[३] त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्‍या अंध होतील.[४] जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दानेदेखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर2 मंदावतील.[५] ते चढावाला भितील; रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल; बदाम फुलेल; टोळसुद्धा जड असा वाटेल; वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील.[६] मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्‍याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल.[७] तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India