A A A A A

चांगले पात्र: [धैर्य]


कायदे ४:२९-३१
[२९] तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;[३०] आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”[३१] त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.

२ करिंथकर ३:१२
तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;

कायदे १४:३
ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले; त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली.

कायदे १३:४६
तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.

कायदे १९:८
नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.

फिलेमोन १:८
ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे,

कायदे १८:२६
तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.

मार्क १५:४३
म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.

कायदे २८:३१
कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.

कायदे ४:२९-३०
[२९] तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;[३०] आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”

नीतिसूत्रे २८:१
कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.

उत्पत्ति १८:२३-३२
[२३] अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय?[२४] त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?[२५] ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”[२६] परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.”[२७] अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;[२८] कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.”[२९] त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या चाळिसांकरता मी तसे करणार नाही.”[३०] मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”[३१] मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”[३२] तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”

स्तोत्र १३८:३
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.

इफिसियन्स ३:१२
त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत.

जॉन ४:१७
ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस,

इब्री १०:१९
म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;

इब्री ४:१६
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.

इब्री १३:६
म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”

इफिसियन्स ६:१९-२०
[१९] माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.[२०] ***

कायदे 4:13
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.

१ तीमथ्य 3:13
कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात.

१ थेस्सलनीकाकर २:२
परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.

फिलिपीन्स 1:20
***

२ तीमथ्य 1:7
कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.

१ करिंथकर 16:13
सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.

नीतिसूत्रे 14:26
परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.

स्तोत्र 27:14
परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.

रोमन्स 1:16
कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.

१ इतिहास 28:20
मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नकोस, खचू नकोस, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्याबरोबर आहे; परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही.

१ करिंथकर १५:५८
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2

इफिसियन्स 6:10
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.

यशया 54:4
भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.

जॉन 14:27
मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.

मार्क 5:36
परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्‍याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.”

फिलिपीन्स 1:28
आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहीत; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे.

जॉन 7:26
पाहा, तो उघडउघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकार्‍यांनी खरोखरच ओळखले आहे काय?

कायदे 5:29
परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.

यहोशवा 1:7
मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.

यहेज्केल 3:9
मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.”

कायदे ९:२९
शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले.

फिलिपीन्स 1:1
फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून:

१ तीमथ्य 3:1
कोणी अध्यक्षाचे3 काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे.

१ करिंथकर 3:12
ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो,

इब्री 10:1
तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.

१ पीटर 5:10
आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India