A A A A A

देव: [शाप]


लेवीय २०:९
आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्याशाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.

अनुवाद २८:१५
उलटपक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील:

निर्गम २१:१७
कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जिवे मारावे.

यिर्मया १५:१०
अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.

गलतीकर ३:१३
आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;

निर्गम ३४:७
हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”

लूक ६:२८
जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

नंबर १४:१८
‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’

उत्पत्ति ३:१७
आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;

नीतिसूत्रे २६:२
भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.

अनुवाद ५:९
त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो;

गलतीकर ५:१
ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.

निर्गम २०:५
त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;

२ करिंथकर ५:१७
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.

१ योहान ४:४
मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.

२ शमुवेल १६:५-८
[५] दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.[६] तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला; सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूंना होते.[७] शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो;[८] ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे, आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे; तू रक्तपात करणारा माणूस आहेस, ह्यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस,”

अनुवाद २१:२३
तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नयेस, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस; कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो; तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नकोस.

निर्गम २०:५-६
[५] त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;[६] आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

१ शमुवेल १७:४३
तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले.

यहेज्केल १८:२०
जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.

यिर्मया 31:29-30
[29] ‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत.[30] तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील.

निर्गम २०:६
आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

अनुवाद १८:१०-१२
[१०] आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,[११] वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.[१२] कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.

रोमन्स ८:३७-३९
[३७] उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.[३८] कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले,[३९] उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.

१ पीटर ५:८-९
[८] सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.[९] त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत.

उत्पत्ति ३:१७-१९
[१७] आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;[१८] ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;[१९] तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”

उत्पत्ति ४:१०-१२
[१०] तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.[११] तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;[१२] तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”

उत्पत्ति ९:१८-२७
[१८] नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप.[१९] हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.[२०] नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला;[२१] तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्‍यात उघडानागडा पडला.[२२] तेव्हा कनानाचा बाप हाम ह्याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले.[२३] तेव्हा शेम व याफेथ ह्यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यांवर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली; त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही.[२४] द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले.[२५] तो म्हणाला, “कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.”[२६] तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्य! कनान त्याचा दास होईल.[२७] देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”

१ राजे २:३२-४६
[३२] त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.[३३] त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी ह्यांना परमेश्वराकडून सर्वकाळ शांती प्राप्त होईल.”[३४] यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने जाऊन यवाबावर हल्ला करून त्याला ठार मारले, आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्याला मूठमाती दिली.[३५] राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.[३६] राजाने शिमीला बोलावून आणून सांगितले, “तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नकोस.[३७] ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज; तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल.”[३८] शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, माझ्या स्वामीराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला दास करील.” शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला;[३९] पण तीन वर्षे लोटल्यावर शिमीचे दोन दास गथचा राजा आखीश बिन माका ह्याच्याकडे पळून गेले; तेव्हा “तुझे दास गथ येथे आहेत” अशी कोणी त्याला खबर दिली.[४०] मग शिमी आपल्या गाढवांवर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास आखीशाकडे गेला व त्यांना तेथून घेऊन आला.[४१] शिमी यरुशलेमेहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शलमोनाला सांगण्यात आले;[४२] तेव्हा राजाने शिमीला बोलावून आणून म्हटले, “‘ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणाला मुकशील हे पक्के ध्यानात ठेव’ असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना? आणि तू मला असे म्हणाला होतास ना की, ‘जे मी आता ऐकले ते ठीक आहे?’[४३] तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम हे तू का मानले नाहीत?”[४४] राजा शिमीला म्हणाला, “माझा बाप दावीद ह्याच्याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जिवाला ठाऊक आहे, तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईल असे करील.[४५] शलमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील.”[४६] राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणाला मुकला. शलमोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.

जॉब २:९
तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.”

जॉब १९:१७
माझा श्वास माझ्या स्त्रीला अप्रिय वाटतो; माझ्या सहोदरांना माझी किळस येते.

जॉब १:१०
तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना?

इफिसियन्स ६:१०-१७
[१०] शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.[११] सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.[१२] कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.[१३] ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.[१४] तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;[१५] शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,[१६] आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.[१७] तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.

मॅथ्यू ५:२२
मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.

रोमन्स ३:२३
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;

रोमन्स ६:२३
कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

उत्पत्ति ९:२५
तो म्हणाला, “कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.”

स्तोत्र १०४:९
तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही; भूमी झाकायला त्यांना परत येववत नाही.

उत्पत्ति ६:१२
देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.

उत्पत्ति ७:२०
पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले.

उत्पत्ति ८:५-९
[५] दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले.[६] ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली,[७] आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला.[८] पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले.[९] त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले.

उत्पत्ति ९:११
तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत, आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही.”

रोमन्स १२:१४
तुमचा छळ करणार्‍यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India