A A A A A

अतिरिक्त: [तुटलेले ह्रदय]


१ करिंथकर ௧௩:௭
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

१ पीटर ൫:൭
त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.

१ शमुवेल १६:७
पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”

२ करिंथकर ௫:௭
आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी1 दिसते त्याप्रमाणे चालत नाही.

२ करिंथकर ௧௨:௯
परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.

इब्री ௧௩:௫
तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”

यशया ൬:൧
उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते.

यशया ௪௧:௧௦
तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.

यशया ५७:१५
कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो: “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.

यिर्मया ௨௯:௧௧
परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.

जॉन 3:16
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

जॉन 12:40
“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”

जॉन ௧௪:௧
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.

जॉन ௧௪:௨௭
मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.

जॉन ௧௬:௩௩
माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”

लूक ௨௪:௩௮
त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?

मार्क ११:२३
मी तुम्हांला खचीत सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटून समुद्रात टाकला जा,’ असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.

मॅथ्यू ௫:௮
‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.

मॅथ्यू ௧௧:௨௮
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.

नीतिसूत्रे ௩:௫
तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;

स्तोत्र ३४:१८
परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.

स्तोत्र ௫௧:௧௭
देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.

स्तोत्र ५५:२२
तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.

स्तोत्र ௧௪௭:௩
भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.

प्रकटीकरण ௨௧:௪
‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”

रोमन्स ८:२८
परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.

रोमन्स ௧௨:௨
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.

नीतिसूत्रे ௪:௨௩
सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.

नीतिसूत्रे ३:५-६
[५] तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;[६] तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.

१ करिंथकर ௬:௧௯-௨௦
[௧௯] तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;[௨௦] कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.

फिलिपीन्स ௪:௬-௭
[௬] कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.[௭] म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.

मॅथ्यू ११:२८-३०
[२८] अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.[२९] मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’[३०] कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”

स्तोत्र ३४:१-२२
[१] दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.[२] माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.[३] तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.[४] मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.[५] ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.[६] ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.[७] परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.[८] परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य![९] परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही.[१०] तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.[११] मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.[१२] सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण?[१३] तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर,[१४] वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.[१५] परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.[१६] वाईट करणार्‍यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.[१७] नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.[१८] परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.[१९] नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.[२०] त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.[२१] दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार; नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात.[२२] परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India