A A A A A

अतिरिक्त: [तिरस्कार]


डॅनियल ११:३१
त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.

डॅनियल १२:११
नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.

अनुवाद २२:५
स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणार्‍या प्रत्येकाचा वीट आहे.

अनुवाद २३:१८
वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.

अनुवाद २४:४
तर तिला घालवून देणार्‍या पहिल्या नवर्‍याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.

यशया १:१३
निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.

लेवीय ७:१८
त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसर्‍या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही; उलट, ते अमंगळ ठरेल; आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल.1

लेवीय १८:२२
स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय.

नीतिसूत्रे ११:१
खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.

नीतिसूत्रे ११:२०
जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्त्विकतेचा आहे त्यांच्याबद्दल त्याला आनंद वाटतो.

नीतिसूत्रे १२:२२
असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.

नीतिसूत्रे १५:८
दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.

नीतिसूत्रे १५:२६
परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत.

नीतिसूत्रे 16:5
प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो.

नीतिसूत्रे १७:१५
दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.

नीतिसूत्रे २०:१०
वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे.

नीतिसूत्रे २०:२३
वजनावजनांत फरक असणे ह्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही.

नीतिसूत्रे २८:९
नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.

प्रकटीकरण २१:२७
‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.

मार्क १३:१४
[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.

मॅथ्यू २४:१५
दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),

रोमन्स १:२६-२७
[२६] ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.[२७] तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.

लेवीय २०:१२-१३
[१२] कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी विपरीत कृत्य केले आहे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.[१३] कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

नीतिसूत्रे ६:१६-२०
[१६] परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे:[१७] उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात,[१८] दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय,[१९] लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.[२०] माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India