A A A A A

देव: [शाप]


लेवीय २०:९
“जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.

अनुवाद २८:१५
“पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.

निर्गम २१:१७
“जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.

यिर्मया १५:१०
माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.

गलतीकर ३:१३
ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.”

निर्गम ३४:७
परमेश्वर हजारो लोकांवर दया करतो; तो लोकांच्या वाईट कर्माची त्यांना क्षमा करतो; परंतु तो दोषी लोकांना शिक्षा करावयास विसरत नाही; परमेश्वर फक्त लोकांनाच शिक्षा करतो असे नाही परंतु त्यांची मुले, त्यांची नातवंडे व पतवंडे ह्यांना म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत, त्यांच्या पूर्वजाच्यां अपराधाबद्दल शिक्षा भोगावयास लावतो.”

लूक ६:२८
जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

नंबर १४:१८
तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी बद्दल शिक्षा करतो.’

उत्पत्ति ३:१७
नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, “त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;

नीतिसूत्रे २६:२
एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात.

अनुवाद ५:९
कोणत्याही प्रकारच्या मूर्तीची पूजा किंवा सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या लोकांनी इतर देवांची पूजा करावी ह्याचा मला द्वेष आहे. जे माझ्याविरुध्द पाप करतात ते माझे शत्रू बनतात. त्यांना मी शासन करीन. एवढेच नव्हे तर त्यांची मुले, नातवंडे अशा व पतंवडे चार पिढ्यांना शासन करीन.

गलतीकर ५:१
आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.

निर्गम २०:५
त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;

२ करिंथकर ५:१७
म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे!

१ योहान ४:४
माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे.

२ शमुवेल १६:५-८
[५] पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी. तो दावीदाला पुन्हा पुन्हा शिव्याशाप देत चालला होता.[६] त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.[७] शिमी दाविदला शाप देतच होता, “चालता हो, तोंड काळं कर इथून. तू खूनी आहेस![८] देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांना तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.”

अनुवाद २१:२३
तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

निर्गम २०:५-६
[५] त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;[६] परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

१ शमुवेल १७:४३
तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली.

यहेज्केल १८:२०
पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

यिर्मया ३१:२९-३०
[२९] “आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली, पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली. ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.[३०] प्रत्येकजण आपल्या पापाने मरेल. जो आंबट द्राक्षे खाईल, तोच त्याची चव चाखील.”

निर्गम २०:६
परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.

अनुवाद १८:१०-१२
[१०] आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.[११] वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये.[१२] अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे.

रोमन्स ८:३७-३९
[३७] तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत.[३८] कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात,[३९] येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.

१ पीटर ५:८-९
[८] सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो.[९] परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वत: तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल.

उत्पत्ति ३:१७-१९
[१७] नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, “त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;[१८] जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.[१९] तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील.”

उत्पत्ति ४:१०-१२
[१०] नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस?[११] तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल.[१२] पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.”

उत्पत्ति ९:१८-२७
[१८] हे नोहाचे तीन मुलगे होते; यांच्या पासूनच पृथ्वीवर लोकवस्ती झाली.[१९] नोहा शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला;[२०] त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला.[२१] तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडानागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले;[२२] मग शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला व तो आपल्या पाठीवर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाहीं.[२३] नंतर नोहा जागा झाला, (तो द्राक्षारसाच्या नशेमुळे झोपला होता) तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले.[२४] तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”[२५] नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो.[२६] देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”[२७] जलप्रलया नंतर नोहा साडेतीनशे वर्षे जगला;

१ राजे २:३२-४६
[३२] नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे.[३३] त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”[३४] तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.[३५] यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली.[३६] मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.[३७] हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”[३८] तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला.[३९] पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले.[४०] तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.[४१] शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.[४२] तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, ‘यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस.[४३] मग तू आज्ञाभंग का केलास? तू वचन का मोडलेस?[४४] माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील.[४५] पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.[४६] मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.”

जॉब २:९
ईयोबची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?”

जॉब १९:१७
माझी बायको माझ्या श्वासाच्या वासाचा तिरस्कार करते. माझे भाऊ माझा तिरस्कार करतात.

जॉब 1:10
तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.

इफिसियन्स 6:10-17
[10] देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे.[11] कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे.[12] म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.[13] म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा.[14] आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला.[15] या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल.[16] आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या.[17] प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.

मॅथ्यू 5:22
पण मी तुम्हांस सागतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

रोमन्स 3:23
सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.

रोमन्स 6:23
कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

उत्पत्ति ९:२५
नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो.

स्तोत्र 104:9
तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.

उत्पत्ति ६:१२
जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता.

उत्पत्ति ७:२०
पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.

उत्पत्ति ८:५-९
[५] आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला.[६] जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.[७] जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.[८] सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले;[९] तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले,

उत्पत्ति ९:११
आणि देव म्हणाला, “मी तुम्हाशी हा करार केल्याची काही तरी खूण तुम्हाला देतो त्या खुणेवरुन (पुराव्यावरुन) मी तुम्हाशी व सर्व सजीव सृष्टीशी करार केल्याचे दिसेल. हा करार पिढ्यानपिढ्या व युगानुयुग कायम राहील.

रोमन्स 12:14
जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका.

Marathi Bible 1826
Public Domain 1826