A A A A A

देव: [आज्ञा]


मार्क १०:१९
तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

लूक १८:२०
“तुला आज्ञा माहीत आहेत: “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’

मॅथ्यू २२:३४-४०
[३४] येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घलता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.[३५] एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.[३६] त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”[३७] येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’[३८] ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.[३९] हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.[४०] सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”

रोमन्स १३:९
“व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” या शब्दात सामावलेली आहे.

मॅथ्यू १९:१६-१९
[१६] एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”[१७] येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”[१८] त्याने विचारले, कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको.[१९] आपल्या आईवडिलांना मान दे आणि जशी स्वत:वर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’

मॅथ्यू २२:३६-४०
[३६] त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”[३७] येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’[३८] ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.[३९] हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.[४०] सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”

मॅथ्यू १०:१७-२२
[१७] माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील.[१८] माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल.[१९] जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल.[२०] कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.[२१] “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.[२२] माझ्यामुळे सर्व तुचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.

रोमन्स १३:८-१४
[८] एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे.[९] “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” या शब्दात सामावलेली आहे.[१०] प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.[११] आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे.[१२] रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि ‘दिवस’ जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु.[१३] दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.[१४] जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे.

मार्क १२:२८-३४
[२८] त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घातलाना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वची पाहिली आज्ञा कोणती?”[२९] येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे.[३०] तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अत:करणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’[३१] दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”[३२] तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात.”[३३] त्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणार तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”[३४] येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.

निर्गम ३४:२८
मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न किंवा पाणी घेतले नाही; आणि मोशेने त्या पवित्रकराराची वचने - दहा आज्ञा - त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिली.

अनुवाद ४:१३
परमेश्वराने आपला पवित्र करार तुम्हाला सांगितला. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.

अनुवाद १०:४
मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हाला दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.

अनुवाद ५:७-२२
[७] “माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचीही तुम्ही उपासना करता कामा नये.[८] “तुम्ही कोणतीही मूर्ती करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका.[९] कोणत्याही प्रकारच्या मूर्तीची पूजा किंवा सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या लोकांनी इतर देवांची पूजा करावी ह्याचा मला द्वेष आहे. जे माझ्याविरुध्द पाप करतात ते माझे शत्रू बनतात. त्यांना मी शासन करीन. एवढेच नव्हे तर त्यांची मुले, नातवंडे अशा व पतंवडे चार पिढ्यांना शासन करीन.[१०] पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील.[११] “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाचा तुम्ही गैरवापर करु नका. जो गैरवापर करील तो दोषी ठरेल. मग परमेश्वर त्याची गय करणार नाही.[१२] “शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या आज्ञेप्रमाणे विशेष दिवस म्हणून पाळा.[१३] आठवड्यातील सहा दिवस काम करा.[१४] पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ विश्रांतीचा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुलं, मुली, अतिथी किंवा दास-दासी, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे.[१५] मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हाला मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याचा आज्ञा आहे.[१६] “आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.[१७] “कोणाचीही हत्या करु नका.[१८] “व्यभिचार करु नका.[१९] “चोरी करु नका.[२०] “आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.[२१] “दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दास दासी, गुरे-गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.”[२२] पुढे मोशे, म्हणाला, “ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली.

अनुवाद ६:२१
तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले.

अनुवाद १०:१-५
[१] “तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. ‘त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडी पेटीही कर’ असे ही सांगितले.[२] तो पुढे म्हणाला, ‘तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या पेटीत ठेव.’[३] “मग मी बाभळीच्या लाकडाची पेटी केली. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.[४] मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हाला दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.[५] मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या पेटीत ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.”

निर्गम २०:१-१७
[१] मग देव म्हणाला,[२] “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.[३] “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.[४] “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;[५] त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;[६] परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.[७] “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.[८] “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;[९] आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;[१०] परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;[११] कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.[१२] “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.[१३] “कोणाचाही खून करु नकोस.[१४] “व्यभिचार करु नकोस.[१५] “चोरी करु नकोस.[१६] “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.[१७] “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

निर्गम २४:१२
परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांसाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”

निर्गम ३४:१०-२९
[१०] मग परमेश्वर म्हणाला, “मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी या पूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; तुझ्याबरोबर असलेले सर्व लोक पाहातील की मी जो परमेश्वर आहे तो महान सामर्थ्यवान आहे; मी तुझ्यासाठी जे चमत्कार करीन ते पाहून सर्व लोकांना माझे सामर्थ्य कळेल.[११] मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी तुझ्या शत्रुंना तुझ्या पुढून घालवून देईन म्हणजे अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांना तुझ्या देशातून घालवून देईन.[१२] सावध राहा! तू ज्या देशात जात आहेस त्यात राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करु नकोस; जर तसे करशील तर तुमच्यावर संकट येईल.[१३] परंतु त्यांच्या वेद्या नष्ट करा; ते उपासना करीत असलेले दगडधोंडे तोडून टाका; त्यांच्या मूर्ती फोडून टाका.[१४] दुसऱ्या कोणत्याही दैवतांची पूजा करु नका; मी ‘याव्हे’ (कानाह) आहे; हे माझे नांव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे.[१५] “सावध राहा! या देशातील रहिवाशांबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करु नका; जर तुम्ही ते कराल तर ते लोक त्यांच्या दैवतांना नमन करताना कदाचित तुम्ही त्यांना साथ देऊन त्यांच्या दैवतांना नमन कराल; ते लोक त्यांच्या पूजेच्या वेळी तुम्हाला भाग घेण्यासाठी बोलावतील आणि तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.[१६] त्या लोकातील मुलींची तुम्ही आपल्या मुलांसाठी बायका म्हणून कदाचित् निवड कराल; त्या मुली तर खोट्या दैवतांची उपासना करत असतील तर, त्या कदाचित् तुमच्या मुलांना देखील त्यांची उपासना करावयास लावतील.[१७] “तुम्ही आपल्यासाठी ओतीव मुर्ती करु नका.[१८] “बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवस पर्यत तुम्ही बेखमीर भाकर खावी कारण ह्याच महिन्यात मिसर देशातून तुम्ही बाहेर आलात.[१९] “स्त्रीपासून जन्मलेला प्रथम पुत्र माझा आहे; तसेच तुमच्या गुराढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नर माझे आहेत.[२०] गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरु देऊन सोडवून घ्यावे पण त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक पहिला जन्मलेला मुलगा मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.[२१] “सहा दिवस तू आपले कामकाज कर परंतु सातव्या दिवशी अवश्य विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू अवश्य विसावा घे.[२२] “तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळ. गव्हाच्या पिकाचे पहिले धान्य या सणासाठी वापर. आणि वर्ष परिवर्तनाच्या काळात सुगीचा सण पाळ.[२३] “तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा प्रभु परमेश्वर म्हणजे इस्राएलाचा देव याच्यासमोर हजर राहावे.[२४] “तुझ्या देशात जाशील तेव्हा तुझ्या शत्रुंना मी तुझ्या देशातून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वरासमोर हजर राहावयास जाशील त्यावेळी तुझ्यापासून तुझ्या देश घेण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही.[२५] “माझ्या यज्ञबलीचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये;” आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूच्या मांसापैकी काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यत राहू देऊ नये.[२६] “हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पीक, तुझा जो देव परमेश्वर, याच्या मंदिरात आण; “करडू त्याच्या आइच्या दुधात कधीच शिजवू नये.”[२७] “मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी लिहून ठेव कारण त्या, मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी केलेल्या कराराच्या त्या गोष्टी आहेत.”[२८] मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न किंवा पाणी घेतले नाही; आणि मोशेने त्या पवित्रकराराची वचने - दहा आज्ञा - त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिली.[२९] मग मोशे, पवित्रकरार लिहिलेल्या त्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजाने तळपत होता, परंतु ते त्याला ठाऊक नव्हते.

अनुवाद ६:४-९
[४] “हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.[५] आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.[६] मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.[७] त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा.[८] त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा.[९] दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.

निर्गम २०:२-१७
[२] “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.[३] “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.[४] “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;[५] त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;[६] परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.[७] “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.[८] “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;[९] आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;[१०] परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;[११] कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.[१२] “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.[१३] “कोणाचाही खून करु नकोस.[१४] “व्यभिचार करु नकोस.[१५] “चोरी करु नकोस.[१६] “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.[१७] “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

निर्गम ३१:१८
या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन सपाट दगडी पाट्या (आज्ञापट) मोशेला दिल्या.

जॉन १४:१५
“जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.

मॅथ्यू १९:१८
त्याने विचारले, कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको.

जॉन १५:१०
ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.

मॅथ्यू ५:१७
“मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे.

निर्गम ३२:१५
मग मोशे पर्वतावरुन खाली उतरला; कराराच्या दोन सपाट पाट्या त्याच्या जवळ होत्या; त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना आज्ञा लिहिलेल्या होत्या.

जॉन १५:१२-१७
[१२] जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे.[१३] आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही.[१४] मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात.[१५] आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.[१६] तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे[१७] तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.

निर्गम ३२:१६
देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्याने स्वत:च त्यांच्यावर कोरुन आज्ञा लिहिलेल्या होत्या.

निर्गम ३४:२७
“मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी लिहून ठेव कारण त्या, मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी केलेल्या कराराच्या त्या गोष्टी आहेत.”

Marathi Bible 1826
Public Domain 1826