A A A A A

वाईट वर्ण: [तक्रार]


स्तोत्र १४४:१४
आमचे सैनिक सुरक्षित आहेत. कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रचत्न करीत नाही. आम्ही लढाईवर जात नाही. आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.

नहेम्या ८:१
त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळया जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच.

यशया २४:११
बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.

यिर्मया १४:२
“यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.

नीतिसूत्रे २३:२९
म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो.

फिलिपीन्स ४:६-७
[६] कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा.[७] जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत:करण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.

Marathi Bible 1826
Public Domain 1826