A A A A A

अतिरिक्त: [नरभक्षण]


यिर्मया १९:९
नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वत:च्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’

यहेज्केल ५:१०
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.

लेवीय २६:२९
तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल.

२ राजे ६:२८-२९
[२८] मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’[२९] तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”

विलाप ४:१०
त्या वेळी, प्रेमळ बायकांनीसुध्दा आपली मुले शिजविली ती मुलेच त्यांच्या आयांचे अन्न झाले. माझ्या लोकांचा नाश झाला. तेव्हा असे घडले.

विलाप २:२०
परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?

अनुवाद २८:५३-५७
[५३] “तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.[५४] “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.[५५] खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.[५६] “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.[५७] पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.

उत्पत्ति १:२६-२७
[२६] देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”[२७] देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील.

२ करिंथकर ५:८
आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू.

लूक १६:१९-२६
[१९] “एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे.[२०] त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते.[२१] त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.[२२] मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले.[२३] आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले,[२४] तो मोठ्याने ओरडला, “पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!”[२५] परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस.[२६] आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’

प्रकटीकरण २०:११-१५
[११] नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मी पाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.[१२] नंतर मेलेले लहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक. म्हणजे जीवनी पुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यात आला.[१३] सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले. तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले. आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला.[१४] नंतर मरण व अधोलोक यांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय.[१५] आणि जर कोणाचे नाव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते.

अनुवाद २८:५३
“तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.

१ करिंथकर १४:३४-३५
[३४] स्त्रियांनी सभेत गप्प बसावे, कारण त्यांच्यासाठी सभेत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते,[३५] त्यांना जर काही शिकायचे असेल, तर त्यांनी स्वत:च्या पतीला घरी विचारावे. कारण स्त्रीने सभेत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.

लूक १:३७
कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”

जॉन १:१
जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता.

अनुवाद २८:५७
पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.

१ तीमथ्य २:११-१५
[११] स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे.[१२] मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे.[१३] मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला.[१४] त्यानंतर हवा. आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली. आणि ती पापात पडली.[१५] परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.

१ तीमथ्य ५:३-१६
[३] ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे.[४] पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे.[५] जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते.[६] पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे.[७] म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही.[८] पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.[९] एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्र झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी.[१०] चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबालांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वत:ला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.[११] पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.[१२] आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते.[१३] आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वत:ला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.[१४] यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.[१५] मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.[१६] जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिनेत्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.

१ करिंथकर ११:२-१६
[२] मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता.[३] परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.[४] प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो.[५] परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.[६] जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.[७] ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.[८] पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.[९] आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.[१०] यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.[११] तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.[१२] कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.[१३] हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?[१४] पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय?[१५] परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गत: आच्छादनासाठी दिले आहेत.[१६] जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.

Marathi Bible 1826
Public Domain 1826