A A A A A


शोधा

मॅथ्यू ५:३२
परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.


मॅथ्यू १९:९
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”


मॅथ्यू १९:१०
शिष्य त्याला म्हणाले, “पत्नीच्या बाबतीत पुरुषाची जबाबदारी अशी असली तर लग्न न केलेले बरे.”


मॅथ्यू १९:१२
कारण लग्न न करण्याची विविध कारणे आहेतः काही जणांची जन्मतःच अशी जडणघडण झालेली असते की, ते लग्न करू शकत नाहीत; काही जणांना माणसांनी तसे बदलले म्हणून लग्न करता येत नाही आणि इतर काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी लग्न करत नाहीत. ज्याला हे स्वीकारता येते, त्याने स्वीकारावे.”


मॅथ्यू २२:२
तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले.


मॅथ्यू २२:३
लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात.


मॅथ्यू २२:४
पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’


मॅथ्यू २२:८
त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते.


मॅथ्यू २२:९
म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’


मॅथ्यू २२:१०
त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेबाईट असे जितके आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप लोकांनी भरून गेला.


मॅथ्यू २२:११
परंतु राजा पाहुण्यांना भेटायला आला तेव्हा लग्नसमारंभास साजेसे कपडे न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.


मॅथ्यू २२:१२
तो त्याला म्हणाला, “मित्रा, लग्नाचा पोषाख न घालता तू येथे कसा आलास?’ त्याला काही उत्तर देता येईना.


मॅथ्यू २२:२५
आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली.


मॅथ्यू २२:३०
पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.


मॅथ्यू २४:३८
जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुष लग्न करत होते व लग्न लावून देत होते


मॅथ्यू २५:१०
त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.


मार्क ६:१७
हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते


मार्क १०:११
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो,


मार्क १०:१२
तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.”


मार्क १२:२५
मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.


लूक १२:३५
लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे.


लूक १४:८
“कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले, तर मानाच्या आसनावर बसू नकोस. तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असण्याची शक्यता आहे.


लूक १४:२०
आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’


लूक १६:१८
जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो.


लूक १७:२७
नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते.


लूक २०:२९
एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला.


लूक २०:३४
येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात.


लूक २०:३५
परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत.


१ करिंथकर ७:९
तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे.


१ करिंथकर ७:११
परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.


१ करिंथकर ७:२७
तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस.


१ करिंथकर ७:२८
तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे.


१ करिंथकर ७:३६
परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही.


१ करिंथकर ७:३८
जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो.


१ करिंथकर ७:३९
पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नी बांधील आहे. पती मरण पावल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ ख्रिस्ती माणसाबरोबर, लग्न करायला ती मोकळी आहे.


१ तीमथ्य ४:३
लग्न करावयाची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी कृतज्ञतेने ज्याचा उपभोग घ्यावयाचा, असे देवाने निर्माण केलेले खाद्य वर्ज्य करावे, असे सांगतील.


१ तीमथ्य ५:१०
शिवाय तिचे एकदाच लग्न झालेले असावे व सत्कृत्यांसाठी, मुलाबाळांचा सांभाळ, पाहुणचार, पवित्र लोकांची नम्र सेवा, संकटग्रस्तांना साहाय्य ह्यासाठी ती नावाजलेली असावी.


१ तीमथ्य ५:११
परंतु तरुण विधवांची ह्या यादीत नोंद करू नये; कारण जेव्हा त्या कामुक होऊन लग्न करावयास पाहतात तेव्हा त्या ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतात


१ तीमथ्य ५:१४
ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये;


इब्री १३:४
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


प्रकटीकरण १९:७
आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे,


प्रकटीकरण १९:९
तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”


Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India