A A A A A


शोधा

मॅथ्यू १:१
अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी:


मॅथ्यू १:१२
बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती.


मॅथ्यू १:१८
येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्‌निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.


मॅथ्यू १:२१
तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”


मॅथ्यू १:२५
मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.


मॅथ्यू २:१
हेरोद राजाच्या अमदानीत यहुदियातील बेथलेहेम नगरात येशूच्या जन्मानंतर, पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष यरुशलेम येथे येऊन विचारपूस करू लागले,


मॅथ्यू ३:१३
तेव्हा योहानकडून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलहून यार्देन नदीवर आला.


मॅथ्यू ३:१५
येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे, कारण अशा प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे उचित आहे.” तेव्हा येशूने त्याला तसे करू दिले.


मॅथ्यू ३:१६
बाप्तिस्मा घेतल्यावर लगेच येशू पाण्यातून वर येत असताना, पाहा, स्वर्ग उघडला आणि त्याला दिसले की, परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरत आहे


मॅथ्यू ४:१
सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले.


मॅथ्यू ४:७
येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’”


मॅथ्यू ४:१०
येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”


मॅथ्यू ४:११
नंतर सैतान येशूला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.


मॅथ्यू ४:१२
योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला


मॅथ्यू ४:१७
तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”


मॅथ्यू ४:१८
येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते.


मॅथ्यू ४:२१
तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले.


मॅथ्यू ४:२२
त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.


मॅथ्यू ४:२३
येशू यहुदी लोकांच्या सभास्थानांत प्रबोधन करीत, राज्याचे शुभवर्तमान जाहीर करत गालीलभर फिरला आणि त्याने लोकांचे सर्व प्रकारचे रोग व आजार बरे केले.


मॅथ्यू ५:१
लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.


मॅथ्यू ७:२८
येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला;


मॅथ्यू ८:१
येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या.


मॅथ्यू ८:३
येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला.


मॅथ्यू ८:४
नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”


मॅथ्यू ८:५
येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली,


मॅथ्यू ८:७
येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”


मॅथ्यू ८:१०
हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही.


मॅथ्यू ८:१३
नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.


मॅथ्यू ८:१४
येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले.


मॅथ्यू ८:१८
आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला.


मॅथ्यू ८:२०
येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”


मॅथ्यू ८:२२
परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”


मॅथ्यू ८:२३
येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले.


मॅथ्यू ८:२४
एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता.


मॅथ्यू ८:३४
हे ऐकून सर्व नगर येशूला पाहायला आले व त्याला पाहिल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या नगराबाहेर जाण्याची विनंती केली.


मॅथ्यू ९:१
येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला.


मॅथ्यू ९:२
त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”


मॅथ्यू ९:४
येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता?


मॅथ्यू ९:९
तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकात नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.


मॅथ्यू ९:१०
एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्‍तीस बसले होते.


मॅथ्यू ९:११
हे पाहून परुशी येशूच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू अशा जकातदार व पापी लोकांबरोबर का जेवतो?”


मॅथ्यू ९:१२
परंतु हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजाऱ्यांना असते.


मॅथ्यू ९:१४
त्या वेळी योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी उपवास करतो परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”


मॅथ्यू ९:१५
येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना शोक करणे कसे शक्य आहे? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील.


मॅथ्यू ९:१९
येशू उठला व आपल्या शिष्यांसह त्याच्यामागे निघाला.


मॅथ्यू ९:२२
येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली.


मॅथ्यू ९:२३
नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला,


मॅथ्यू ९:२७
येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे आले आणि ओरडत विनवू लागले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”


मॅथ्यू ९:२८
तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. येशूने त्यांना विचारले, “हे करायला मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभो.”


मॅथ्यू ९:३०
आणि त्यांना दिसू लागले. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “पाहा, हे कोणाला सांगू नका.”


मॅथ्यू ९:३५
येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, स्वर्गाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करत आणि सर्व रोग व दुखणी बरी करत नगरांतून व गावांतून फिरत होता.


मॅथ्यू १०:१
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला.


मॅथ्यू १०:४
शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत.


मॅथ्यू १०:५
ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.


मॅथ्यू ११:१
एकदा असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आदेश देण्याचे काम पुरे केले आणि तो तेथून त्यांच्या नगरांत प्रबोधन करायला व शुभवर्तमानाची घोषणा करायला निघाला.


मॅथ्यू ११:४
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानला जाऊन सांगा:


मॅथ्यू ११:७
योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय?


मॅथ्यू ११:२०
ज्या ज्या नगरांमध्ये येशूने पुष्कळ चमत्कार केले होते, तेथील लोकांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून त्याने त्यांना दोष दिला.


मॅथ्यू ११:२५
एकदा येशूने अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना उघड करून दाखवल्या आहेत.


मॅथ्यू १२:१
एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात होता, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली, म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.


मॅथ्यू १२:९
नंतर येशू तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला.


मॅथ्यू १२:१०
तेथे पक्षाघात झालेला एक मनुष्य होता. काही लोकांनी येशूला दोष लावता यावा म्हणून विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”


मॅथ्यू १२:१३
त्यानंतर येशूने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा होऊन अगदी दुसऱ्या हातासारखा झाला.


मॅथ्यू १२:१४
परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.


मॅथ्यू १२:१५
पण हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बरेच लोक त्याच्यामागे गेले. त्यांतील सर्व आजारी लोकांना त्याने बरे केले.


मॅथ्यू १२:२२
एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला.


मॅथ्यू १२:३८
तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.”


मॅथ्यू १२:३९
येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही.


मॅथ्यू १२:४६
येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते.


मॅथ्यू १३:१
त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला.


मॅथ्यू १३:२४
त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले.


मॅथ्यू १३:३१
येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला.


मॅथ्यू १३:३३
येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.”


मॅथ्यू १३:३४
दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे.


मॅथ्यू १३:३६
लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.”


मॅथ्यू १३:५३
हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला.


मॅथ्यू १३:५७
आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.”


मॅथ्यू १४:१
त्या वेळी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली


मॅथ्यू १४:१२
नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली.


मॅथ्यू १४:१३
योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले.


मॅथ्यू १४:१६
येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.”


मॅथ्यू १४:२७
परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.”


मॅथ्यू १४:२९
त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला.


मॅथ्यू १४:३१
येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”


मॅथ्यू १४:३३
जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”


मॅथ्यू १४:३६
“केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.


मॅथ्यू १५:१
यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले,


मॅथ्यू १५:१०
नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या.


मॅथ्यू १५:२१
येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला.


मॅथ्यू १५:२३
तरी येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागून ओरडत येत आहे.”


मॅथ्यू १५:२८
नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!


मॅथ्यू १५:२९
येशू तेथून निघून गालील सरोवराजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला.


मॅथ्यू १५:३०
लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे आल्या, त्यांच्याबरोबर लुळेपांगळे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे पुष्कळ आजारी लोक होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि येशूने त्यांना बरे केले.


मॅथ्यू १५:३२
नंतर येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेवर मूर्च्छित होतील.”


मॅथ्यू १५:३४
येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.”


मॅथ्यू १६:१
एकदा काही परुशी व सदूकी लोक येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले.


मॅथ्यू १६:२
येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’


मॅथ्यू १६:६
येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा, परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.”


मॅथ्यू १६:७
ते आपसात चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून येशू असे म्हणतो.”


मॅथ्यू १६:८
येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याविषयी चर्चा का करता?


मॅथ्यू १६:१३
फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील भागात आल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ओळखतात?”


मॅथ्यू १६:१७
येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


मॅथ्यू १६:२१
तेव्हापासून येशू त्याच्या शिष्यांना उघडपणे सांगू लागला, “मी यरुशलेम येथे जाऊन वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावीत, ठार मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”


मॅथ्यू १६:२४
त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला क्रुस उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे.


मॅथ्यू १७:१
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले.


मॅथ्यू १७:७
येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.”


मॅथ्यू १७:८
त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही.


मॅथ्यू १७:९
ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आदेश दिला, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”


मॅथ्यू १७:१४
ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला,


मॅथ्यू १७:१७
येशूने उत्तर दिले, “अहो विश्वासहीन व चुकलेल्या लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कुठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”


मॅथ्यू १७:१८
येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.


मॅथ्यू १७:१९
त्यानंतर ते एकटे असताना शिष्यांनी येशूला विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”


मॅथ्यू १७:२२
त्याचे शिष्य गालीलमध्ये एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे.”


मॅथ्यू १७:२४
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमात आल्यावर मंदिराचा कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू मंदिराचा कर भरतात का?”


मॅथ्यू १७:२५
त्याने म्हटले, “हो भरतात.” मग पेत्र घरात आल्यावर तो काही बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांकडून की परक्यांकडून?”


मॅथ्यू १७:२६
“परक्यांकडून”, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत.


मॅथ्यू १८:१
एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”


मॅथ्यू १८:२१
त्या वेळी पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”


मॅथ्यू १८:२२
येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला सांगत नाही, तर सात गुणिले सत्तर वेळा.


मॅथ्यू १९:१
हे प्रबोधन केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देन नदीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला.


मॅथ्यू १९:१३
येशूने लहान मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी त्या लोकांना दटावले.


मॅथ्यू १९:१४
येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”


मॅथ्यू १९:१६
एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्‍वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”


मॅथ्यू १९:१८
तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,


मॅथ्यू १९:२१
येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”


मॅथ्यू १९:२३
नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!


मॅथ्यू १९:२६
परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.”


मॅथ्यू १९:२८
येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.


मॅथ्यू २०:१७
येशू यरुशलेमकडे जायला निघाला असताना त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले,


मॅथ्यू २०:२०
त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली.


मॅथ्यू २०:२२
येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.”


मॅथ्यू २०:२५
परंतु येशूने त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे.


मॅथ्यू २०:२९
येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला.


मॅथ्यू २०:३०
तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”


मॅथ्यू २०:३२
येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?”


मॅथ्यू २०:३४
येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.


मॅथ्यू २१:१
ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले,


मॅथ्यू २१:६
शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले.


मॅथ्यू २१:७
त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला.


मॅथ्यू २१:११
लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.”


मॅथ्यू २१:१२
येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली


मॅथ्यू २१:१६
आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”


मॅथ्यू २१:१८
सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली,


मॅथ्यू २१:२१
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल.


मॅथ्यू २१:२३
येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”


मॅथ्यू २१:२४
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही मला उत्तर दिले तर कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करतो, ते मीही तुम्हांला सांगेन.


मॅथ्यू २१:२७
तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे, ते मीही तुम्हांला सांगणार नाही.


मॅथ्यू २१:३१
ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत.


मॅथ्यू २१:४१
ते येशूला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जी कुळे हंगामाच्या वेळी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.”


मॅथ्यू २१:४२
येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?


मॅथ्यू २२:१
येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला.


मॅथ्यू २२:१५
नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली.


मॅथ्यू २२:१८
येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता?


मॅथ्यू २२:२३
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले,


मॅथ्यू २२:२९
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.


मॅथ्यू २२:३४
येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले.


मॅथ्यू २२:३७
येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’


मॅथ्यू २२:४१
परुशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले,


मॅथ्यू २३:१
नंतर येशू लोकसमुदायाला व त्याच्या शिष्यांना म्हणाला,


मॅथ्यू २४:१
येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले.


मॅथ्यू २४:२
येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला निक्षून सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की, जो पाडला जाणार नाही.”


मॅथ्यू २४:४
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा.”


मॅथ्यू २६:१
येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले,


मॅथ्यू २६:४
येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली.


मॅथ्यू २६:६
येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता,


मॅथ्यू २६:१०
परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.


मॅथ्यू २६:१५
आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.


मॅथ्यू २६:१६
तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.


मॅथ्यू २६:१७
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूला विचारू लागले, “आपणाकरता ओलांडण सणाचे भोजन आम्ही कोठे तयार करावे, अशी आपली इच्छा आहे?”


मॅथ्यू २६:१९
म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडण सणाचे भोजन तयार केले.


मॅथ्यू २६:२५
त्याला धरून देणाऱ्या यहुदाने विचारले, “गुरुजी, तो मी आहे का?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तसेच.”


मॅथ्यू २६:२६
ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”


मॅथ्यू २६:३१
नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’


मॅथ्यू २६:३४
येशूने त्याला म्हटले, “मी तुला निश्चितपणे सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”


मॅथ्यू २६:३५
पेत्र येशूला म्हणाला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही तेच म्हटले.


मॅथ्यू २६:३६
नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”


मॅथ्यू २६:४७
येशू बोलत आहे इतक्यात, बारांमधील एक जण म्हणजे यहुदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडचा एक जमाव तलवारी व सोटे घेऊन आला होता.


मॅथ्यू २६:४८
येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’


मॅथ्यू २६:४९
यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.


मॅथ्यू २६:५०
येशूने त्याला म्हटले, “मित्रा, ज्याकरता तू आलास ते लवकर उरक.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरले व त्याला अटक केली.


मॅथ्यू २६:५१
येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने आपली तलवार उपसली व उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.


मॅथ्यू २६:५२
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील.


मॅथ्यू २६:५५
त्या घटकेस येशू लोकसमुदायाला म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरायला तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही.


मॅथ्यू २६:५७
येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते.


मॅथ्यू २६:५९
मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती.


मॅथ्यू २६:६२
उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”


मॅथ्यू २६:६३
तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”


मॅथ्यू २६:६४
येशू त्यांना म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”


मॅथ्यू २६:६९
इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”


मॅथ्यू २६:७१
तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.”


मॅथ्यू २६:७५
‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.


मॅथ्यू २७:१
भल्या पहाटे सर्व मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी येशूला ठार मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले.


मॅथ्यू २७:३
येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला,


मॅथ्यू २७:११
येशूला रोमन राज्यपालांच्या पुढे उभे केले असता राज्यपालांनी त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.”


मॅथ्यू २७:१७
लोक जमल्यावर पिलातने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की, ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”


मॅथ्यू २७:१८
यहुदी अधिकाऱ्यांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे त्याला ठाऊक होते.


मॅथ्यू २७:२०
इकडे मुख्य याजक व वडीलजन ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूला मरणदंड मिळावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.


मॅथ्यू २७:२२
पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”


मॅथ्यू २७:२६
तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.


मॅथ्यू २७:२७
नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.


मॅथ्यू २७:३२
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले.


मॅथ्यू २७:३४
तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही.


मॅथ्यू २७:३७
त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे.


मॅथ्यू २७:३८
त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे.


मॅथ्यू २७:३९
जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते,


मॅथ्यू २७:४६
आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”


मॅथ्यू २७:५०
नंतर येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला!


मॅथ्यू २७:५३
ते थडग्यांतून निघून येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र शहरात गेले आणि अनेकांच्या दृष्टीस पडले.


मॅथ्यू २७:५४
रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.”


मॅथ्यू २७:५५
तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या.


मॅथ्यू २७:५७
संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता.


मॅथ्यू २७:५८
त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला.


मॅथ्यू २८:५
परंतु देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “भिऊ नका. तुम्ही क्रुसावर खिळलेल्या येशूचा शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे.


मॅथ्यू २८:९
येशू त्यांना वाटेत अचानक भेटून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याची आराधना केली.


मॅथ्यू २८:१०
येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.”


मॅथ्यू २८:१६
इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले.


मॅथ्यू २८:१८
तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


मार्क १:१
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ:


मार्क १:९
त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला.


मार्क १:१२
आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले.


मार्क १:१४
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला,


मार्क १:१६
एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते.


मार्क १:१७
येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”


मार्क १:१८
ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.


मार्क १:२०
त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.


मार्क १:२१
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले.


मार्क १:२४
आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.”


मार्क १:२५
येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”


मार्क १:२९
सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.


मार्क १:३०
शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले.


मार्क १:३४
नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूतग्रस्तांना मुक्त केले. त्या भुतांनी येशूला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.


मार्क १:३५
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला.


मार्क १:४०
एकदा एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली, तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”


मार्क १:४१
येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.”


मार्क १:४३
येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले.


मार्क १:४५
परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.


मार्क २:१
काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहूममध्ये आला. तो घरी आहे, असे लोकांच्या कानी पडले.


मार्क २:५
त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”


मार्क २:८
ते स्वतःशी असा विचार करत आहेत, हे येशूने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही तुमच्या मनात असे विचार का आणता?


मार्क २:१३
येशू तेथून निघून गालील सरोवराच्या किनाऱ्यावर गेला तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. येशूने त्यांना प्रबोधन केले.


मार्क २:१४
तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकात नाक्यावर बसलेला दिसला. त्याला येशूने म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.


मार्क २:१५
नंतर येशू त्याच्या घरी जेवायला बसला असता, तेथे पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूच्या मागे आले आणि तेदेखील येशू व त्याच्या शिष्यांबरोबर पंक्‍तीस बसले.


मार्क २:१७
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”


मार्क २:१८
त्या वेळी योहानचे शिष्य व परुशी उपवास करत होते. तेव्हा काही लोकांनी येऊन येशूला विचारले, “योहानचे व परुश्यांचे शिष्य उपवास करतात परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, हे कसे काय?”


मार्क २:१९
येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्याना उपवास करता येईल का? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.


मार्क २:२३
एकदा येशू साबाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेत कणसे तोडू लागले.


मार्क ३:१
येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता.


मार्क ३:२
येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते.


मार्क ३:६
मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.


मार्क ३:७
त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला


मार्क ३:८
आणि यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा विभाग, तसेच सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा परिसर, ह्यांतून मोठा लोकसमुदाय येशूच्या महान कार्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.


मार्क ३:१३
येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले.


मार्क ३:१४
आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले);


मार्क ३:१७
जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले);


मार्क ३:१९
व येशूचा विश्वासघात करणारा यहुदा इस्कर्योत.


मार्क ३:२०
नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना.


मार्क ३:३१
येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले.


मार्क ४:१
येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते.


मार्क ४:९
पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!”


मार्क ४:१०
येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले.


मार्क ४:३०
येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?


मार्क ४:३५
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.”


मार्क ४:३६
शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते.


मार्क ४:३८
मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?”


मार्क ५:१
येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले.


मार्क ५:६
येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला


मार्क ५:७
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”


मार्क ५:८
तो असे म्हणाला कारण येशू म्हणत होता, “अरे भुता, ह्या माणसातून नीघ.”


मार्क ५:९
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.


मार्क ५:१०
आम्हांला ह्या प्रदेशातून घालवू नकोस”,अशी तो येशूला कळकळीने विनंती करीत होता.


मार्क ५:१२
भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.”


मार्क ५:१५
ते येशूजवळ आल्यावर ज्यात सैन्य होते तो भूतग्रस्त बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांना भीती वाटली.


मार्क ५:१७
तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले.


मार्क ५:१८
येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.”


मार्क ५:२०
तो निघाला आणि येशूने जे महान कार्य त्याच्यासाठी केले होते, ते दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. हे पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले.


मार्क ५:२१
येशू मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे परत गेल्यावर त्याच्याभोवती सरोवराजवळ लोकांचा विशाल समुदाय जमला.


मार्क ५:२३
त्याने येशूला कळकळीने विनंती केली, “माझी लहान मुलगी अत्यंत आजारी आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”


मार्क ५:२७
तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला,


मार्क ५:३०
स्वतःमधून शक्‍ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”


मार्क ५:३६
परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्‍त विश्वास ठेव.”


मार्क ५:३८
ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला.


मार्क ६:१
येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.


मार्क ६:४
येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या कुटुंबीयांत त्याचा सन्मान होत नसतो.”


मार्क ६:७
बारा जणांना स्वतःच्या जवळ बोलावून त्यांना जोडीजोडीने पाठवताना येशूने त्यांना भुतांवर अधिकार दिला.


मार्क ६:१४
हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो महत्कृत्ये करत आहे.”


मार्क ६:३०
प्रेषित येशूजवळ परत आले व त्यांनी जे काही केले व शिकवले, ते सर्व त्याला सांगितले.


मार्क ६:३४
येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला.


मार्क ६:४१
येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले.


मार्क ६:४७
सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता.


मार्क ६:४८
शिष्य वल्ही मारतामारता हैराण झालेले त्याने पाहिले, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. भल्या पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा रोख होता.


मार्क ६:५४
ते मचव्यातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले.


मार्क ६:५५
ते आसपासच्या परिसरात धावपळ करत फिरले व जेथे कोठे येशू आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते आजाऱ्यांना खाटेवर घालून आणू लागले.


मार्क ७:१
त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले.


मार्क ७:१४
त्यानंतर येशूने लोकसमुदायाला पुन्हा जवळ बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या.


मार्क ७:२४
येशू तेथून निघून सोर प्रदेशात गेला. तेथे तो एका घरात गेला, हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते.


मार्क ७:३१
येशू सोर प्रदेशातून निघाला आणि सिदोनमधून दकापलीस प्रांतातून गालील सरोवराकडे परत आला.


मार्क ७:३३
येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला


मार्क ७:३६
“हे कोणाला कळवू नका”, असे येशूने लोकांना निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले.


मार्क ८:१
काही दिवसांनी पुन्हा एकदा लोकांचा विशाल समुदाय जमला होता व लोकांजवळ खायला काही नव्हते म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले,


मार्क ८:७
त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. येशूने त्यांच्यावर आशीर्वाद देउन शिष्यांना तेही वाढायला दिले.


मार्क ८:९
तेथे सुमारे चार हजार लोक होते. त्यानंतर येशूने लोकांना निरोप दिला


मार्क ८:११
एकदा काही परुशी येऊन येशूबरोबर वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ स्वर्गातून चिन्ह मागितले.


मार्क ८:१५
येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर व हेरोदचे खमीर ह्यांच्यापासून जपून राहा.”


मार्क ८:१७
हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?


मार्क ८:२२
येशू व त्याचे शिष्य बेथसैदा येथे आले. तेथे लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणले व त्याने त्याला स्पर्श करावा, अशी विनंती केली.


मार्क ८:२६
त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने ताकीद दिली, “ह्या गावात पुन्हा पाऊलसुद्धा टाकू नकोस.”


मार्क ८:२७
येशू व त्याचे शिष्य फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील खेड्यापाड्यांत जायला निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे, असे लोक म्हणतात?”


मार्क ८:३१
नंतर येशू त्याच्या शिष्यांना अशी शिकवण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावीत, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.


मार्क ८:३२
येशूने उघडपणे हे सर्व सांगितले आणि पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याची निर्भर्त्सना करू लागला.


मार्क ९:१
येशू त्यांना पुढे म्हणाला, “मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”


मार्क ९:२
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले.


मार्क ९:४
मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते.


मार्क ९:५
पेत्र येशूला म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आम्ही तीन मंडप उभारतो. आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”


मार्क ९:८
त्यांनी अकस्मात सभोवती नजर फिरवली तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ फक्त येशूशिवाय दुसरे कोणी दिसले नाहीत.


मार्क ९:१५
येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्‍चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले.


मार्क ९:१९
येशू म्हणाला, “अहो विश्वासहीन लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”


मार्क ९:२०
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्या भुताने येशूला पाहताच मुलाला पिळवटून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस येऊन लोळू लागला.


मार्क ९:२१
येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “ह्याला असे कधीपासून होत आहे?” ते म्हणाले, “बालपणापासून.


मार्क ९:२३
येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.”


मार्क ९:२५
लोक सभोवती गर्दी करीत आहेत, असे पाहून येशू त्या भुताला म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या भुता, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”


मार्क ९:२७
परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला.


मार्क ९:२८
येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”


मार्क ९:३०
येशू व त्याचे शिष्य तेथून निघाले व ते गालीलमधून जात आहेत, हे कोणास कळू नये अशी येशूची इच्छा होती;


मार्क ९:३९
येशू म्हणाला, “त्याला मना करू नका कारण माझ्या नामाने अद्भुत कृत्य करील व लगेच माझी निंदा करील असा कोणी नाही.


मार्क १०:१
येशू तेथून निघून यहुदिया प्रांतात जाऊन यार्देन नदीच्या पलीकडे पोहोचला. पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि नेहमीप्रमाणे तो त्यांना प्रबोधन करू लागला.


मार्क १०:५
येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली.


मार्क १०:१३
येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले.


मार्क १०:१४
ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे.


मार्क १०:१८
येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही.


मार्क १०:२१
येशूने त्याच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहिले व त्याला म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. नंतर येऊन माझा शिष्य हो.”


मार्क १०:२३
येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!”


मार्क १०:२४
शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. तरीही येशू त्यांना पुढे म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे!


मार्क १०:२७
येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “माणसाला हे अशक्य आहे परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.”


मार्क १०:२९
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व शुभवर्तमानाकरता घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे,


मार्क १०:३२
येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमकडे जात असताना येशू शिष्यांच्यापुढे चालत होता. शिष्य विस्मित झाले होते आणि मागोमाग येणारे लोक घाबरले होते. तो पुन्हा त्या बारा जणांना जवळ बोलावून आपल्या बाबतीत काय होणार,ते त्यांना सांगू लागला,


मार्क १०:३८
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकाल का?”


मार्क १०:३९
ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे,


मार्क १०:४२
हे पाहून येशूने सर्वांना जवळ बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे.


मार्क १०:४६
ते यरिहो येथे आले. येशू, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.


मार्क १०:४७
हा नासरेथकर येशू आहे, हे ऐकून तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”


मार्क १०:४९
येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर, ऊठ, येशू तुला बोलावत आहे.”


मार्क १०:५०
तो आपल्या अंगावरचे पांघरुण टाकून उठला व येशूकडे आला.


मार्क १०:५१
येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरुवर्य, मला पुन्हा दिसावे.”


मार्क १०:५२
येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला.


मार्क ११:६
येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी त्यांना उत्तर दिले आणि लोकांनी त्यांना नेऊ दिले.


मार्क ११:७
त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला.


मार्क ११:११
येशू यरुशलेममध्ये आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहून घेतले. परंतु दिवस मावळत आहे, हे पाहून तो बारा जणांबरोबर बेथानीस निघून गेला.


मार्क ११:१४
येशू त्या झाडाला म्हणाला, “कोणी ह्यापुढे तुझे फळ कधी न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.


मार्क ११:१५
ते यरुशलेम येथे पोहोचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली.


मार्क ११:१८
मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी ते योजना आखू लागले; कारण सर्व लोक त्याच्या प्रबोधनावरून थक्क झाल्यामुळे ते त्याला भीत होते.


मार्क ११:१९
संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य शहर सोडून गेले.


मार्क ११:२२
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्‍वास ठेवा.


मार्क ११:२७
ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,


मार्क ११:२९
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मी तुम्हांला सांगेन.


मार्क ११:३३
म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मीही तुम्हांला सांगत नाही.”


मार्क १२:१
येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला, “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्षारसासाठी कुंड खणले. पहाऱ्यासाठी माळा बांधला आणि द्राक्षमळा कुळांकडे सोपवून तो परदेशात निघून गेला.


मार्क १२:१२
तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला, हे त्यांच्या ध्यानात आले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली म्हणून ते येशूला सोडून निघून गेले.


मार्क १२:१३
त्यांनी येशूला बोलण्यात पकडण्याकरता काही परुश्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवले.


मार्क १२:१७
येशू त्यांना म्हणाला, “कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” हे उत्तर ऐकून त्यांना त्याच्याविषयी अत्यंत आश्‍चर्य वाटले.


मार्क १२:२४
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात.


मार्क १२:२८
त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”


मार्क १२:२९
येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे.


मार्क १२:३४
त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून येशूला आणखी काही विचारण्याचे धाडस कुणाला झाले नाही.


मार्क १२:३५
मंदिरात शिकवत असता येशूने प्रश्न विचारला, “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे?


मार्क १२:४१
एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते.


मार्क १३:१
येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, काय हे चिरे व काय ह्या इमारती!”


मार्क १३:२
येशू त्याला म्हणाला, “ह्या भव्य इमारती तू पाहतोस ना? पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा तेथे राहणार नाही.”


मार्क १३:५
येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.


मार्क १४:१
ओलांडण सण व बेखमीर भाकरींच्या सणाला अजून दोन दिवसांचा अवधी होता आणि येशूला कपटाने कसे धरावे व ठार मारावे, हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते.


मार्क १४:३
येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोनच्या घरी जेवायला बसला असता, एक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली. तिने ती फोडून त्याच्या मस्तकावर ओतली.


मार्क १४:६
परंतु येशू म्हणाला, “हिला राहू द्या. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.


मार्क १४:१०
बारा जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कर्योत हा येशूला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेला.


मार्क १४:११
त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला पैसे देऊ केले म्हणून तो येशूला धरून देण्याची सोईस्कर संधी शोधू लागला.


मार्क १४:१२
बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे?”


मार्क १४:१६
शिष्य निघून शहरात गेले. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.


मार्क १४:१७
संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले.


मार्क १४:१८
ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.”


मार्क १४:२२
ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.”


मार्क १४:२४
येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे.


मार्क १४:२७
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’


मार्क १४:३०
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”


मार्क १४:३२
ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”


मार्क १४:३७
तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय?


मार्क १४:४३
येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती.


मार्क १४:४५
यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले.


मार्क १४:४६
तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली.


मार्क १४:४८
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय?


मार्क १४:५१
एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला,


मार्क १४:५३
नंतर त्यांनी येशूला उच्च याजकांच्या घरी नेले. तेथे सर्व मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री एकत्र जमले.


मार्क १४:५५
मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना.


मार्क १४:५६
बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना.


मार्क १४:५७
काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,


मार्क १४:६०
उच्च याजकांनी मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”


मार्क १४:६१
तरी पण येशू गप्प राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा उच्च याजकांनी त्याला विचारले, “धन्य देवाचा पुत्र जो ख्रिस्त, तो तू आहेस काय?”


मार्क १४:६२
येशू म्हणाला, “मी आहे. तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ परमेश्‍वराच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांवर आरूढ होऊन येत असलेला पाहाल.”


मार्क १४:६७
पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”


मार्क १४:७२
त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.


मार्क १५:१
पहाट होताच वडीलजन व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले.


मार्क १५:५
तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्‍चर्य वाटले.


मार्क १५:१०
मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता.


मार्क १५:१५
लोकसमुदायाला खुश करावे, ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.


मार्क १५:२१
गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता.


मार्क १५:२२
त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले.


मार्क १५:२३
त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही.


मार्क १५:३१
तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही!


मार्क १५:३२
इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते.


मार्क १५:३४
दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”


मार्क १५:३७
येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला.


मार्क १५:३९
येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”


मार्क १५:४३
म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.


मार्क १५:४४
येशू इतक्यात कसा निधन पावला, ह्याचे पिलातला आश्‍चर्य वाटले. त्याने सैन्याधिकाऱ्याला बोलावून घेऊन विचारले, “येशूला प्राण सोडून बराच वेळ झाला की काय?”


मार्क १५:४५
सैन्याधिकाऱ्याचा अहवाल ऐकल्यावर त्याने येशूचे शरीर योसेफच्या स्वाधीन करण्यास संमती दिली.


मार्क १५:४७
येशूला कोठे ठेवले, हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.


मार्क १६:१
साबाथनंतर मग्दालिया मरिया, याकोबची आई मरिया व सलोमे ह्यांनी जाऊन येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली.


मार्क १६:६
तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका, क्रुसावर खिळलेल्या नासरेथकर येशूचा तुम्ही शोध घेत आहात ना? तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पाहा.


मार्क १६:९
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती.


मार्क १६:१०
तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले.


मार्क १६:१४
शेवटी अकरा जण जेवायला बसले असता त्यांच्यासमोरही तो प्रकट झाला. ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, त्यांच्यावर ह्या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही म्हणून येशूने अविश्वास व अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांविषयी त्यांची कानउघाडणी केली.


मार्क १६:१९
ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे स्थानापन्न झाला.


मार्क १६:२०
त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.] प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो: निराळ्या प्रकारचा शेवट [त्या स्त्रियांनी जे काही पाहिले होते ते सर्व पेत्र आणि त्याचे सोबती ह्यांना सांगितले. ह्यानंतर स्वतः येशूने त्याच्या शिष्यांद्वारे तारणाचा पवित्र व शाश्वत संदेश जगभर पाठवला.]


लूक १:३१
आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव.


लूक २:२१
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.


लूक २:२७
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले,


लूक २:२८
तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले,


लूक २:३३
येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले.


लूक २:४२
येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले.


लूक २:४३
सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते.


लूक २:५२
येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.


लूक ३:२१
तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले,


लूक ३:२३
येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफचा पुत्र असे समजत. योसेफचे पूर्वज अनुक्रमे पुढीलप्रमाणे:एली, मत्ताथ, लेवी, मल्खी, यन्नया, योसेफ, मत्तिथा, आमोस, नहूम, हेस्ली, नग्गय, महथा, मत्तिथा, शिमयी, योसेख, योदा, योहानान, रेश, जरुब्बाबेल, शल्तिएल, नेरी, मल्खी, अद्दी, कोसाम, एल्मदाम, एर, येशू, अलियेजर, योरीम, मत्ताथ, लेवी, शिमोन, यहुदा, योसेफ, योनाम, एल्याकीम, मलआ, मिन्ना, मत्ताथ, नाथान, दावीद, इशाय, ओबेद, बलाज, सल्मोन, नहशोन, अम्मीनादाब, आद्मीन, अर्णय, हेस्रोन, पेरेस, यहुदा, याकोब, इसहाक, अब्राहाम, तेरह, नाहोर, सरूग, रऊ, पेलेग, एबर, शेलह, केनान, अर्पक्षद, शेम, नोहा, लामेख, मथूशलह, हनोख, यारेद, महललेल, केनान, अनोश, सेथ आणि देवपुत्र आदाम.


लूक ४:१
पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले.


लूक ४:४
येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.”


लूक ४:८
येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”


लूक ४:१२
येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.”


लूक ४:१३
येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला.


लूक ४:१४
येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले.


लूक ४:३४
“आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!”


लूक ४:३५
येशूने त्याला दटावले, “गप्प राहा व ह्याच्यातून निघून जा.” तेव्हा भूत त्या मनुष्याला त्यांच्यासमोर खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले.


लूक ४:४०
ज्या सर्वांचे नातलग नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेले होते त्यांनी त्यांना सूर्यास्ताच्या वेळी येशूकडे आणले. त्याने त्यांच्यांतील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले.


लूक ५:१
एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता.


लूक ५:८
परंतु हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून लांब जा, मी एक पापी मनुष्य आहे.”


लूक ५:१०
तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेसुद्धा आश्‍चर्यचकित झाले होते. येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”


लूक ५:१२
एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.”


लूक ५:१३
तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तत्काळ त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.


लूक ५:१७
एके दिवशी तो बोध करीत असताना गालीलमधील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुशी व धर्मशास्त्राध्यापक तेथे बसले होते. रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशूकडे होते.


लूक ५:१९
परंतु गर्दीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला छपरावरून येशूच्यासमोर खाटेसकट खाली उतरवले.


लूक ५:२२
येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असे विचार का करीत आहात?


लूक ५:२७
त्यानंतर येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”


लूक ५:३०
काही परुशी व त्यांचे शास्त्री हे येशूच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?”


लूक ५:३१
येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.


लूक ५:३४
येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय?


लूक ५:३६
येशूने त्यांना एक दाखलाही सांगितला:“कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाही. तसे केले तर नवीन फाडले जाते व नव्याचे ठिगळ जुन्याशी विसंगत दिसते.


लूक ६:१
एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात असताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले,


लूक ६:३
येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले,


लूक ६:५
नंतर येशूने म्हटले, “मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.”


लूक ६:७
तेव्हा काही शास्त्री व परुशी येशूवर दोष ठेवता यावा म्हणून तो साबाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहायला टपून राहिले.


लूक ६:९
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, साबाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”


लूक ६:११
हे पाहून त्यांच्या तळपायांची आग मस्तकाला गेली व येशूचे काय करावे, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले.


लूक ६:१२
एकदा येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाकडे प्रार्थना करीत राहिला.


लूक ६:१७
येशू प्रेषितांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती उभा होता. तसेच सर्व यहुदिया व यरुशलेम येथून आलेल्या आणि सोर व सिदोन येथील किनारपट्टीवरील लोकांचा विशाल समुदायसुद्धा तेथे उभा होता.


लूक ६:२०
नंतर येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीन जनहो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे.


लूक ६:३९
नंतर येशूने त्यांना दाखलादेखील दिला की, आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचखळग्यांत पडतील की नाही?


लूक ७:१
ही सर्व वचने लोकांना सांगून झाल्यावर येशू कफर्णहूम गावी गेला.


लूक ७:३
त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.”


लूक ७:४
त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे.


लूक ७:६
येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घराजवळ येताच रोमन अधिकाऱ्याने त्याच्याकडे त्याच्या मित्रांना पाठवून त्याला विनंती केली, “प्रभो, आपण तसदी घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही.


लूक ७:९
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही!”


लूक ७:११
नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले.


लूक ७:१५
तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.


लूक ७:३१
येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?


लूक ७:३६
परुश्यातील एकाने येशूला आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. तो त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला.


लूक ७:४०
येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरुजी, बोला.”


लूक ७:४१
“एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते.


लूक ७:४४
तेव्हा येशूने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो, तेव्हा तुम्ही मला पाय घुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु हिने तर आसवांनी माझे पाय भिजवून तिच्या केसांनी ते पुसले.


लूक ८:१
येशू प्रबोधन करीत व देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर करीत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. त्याच्याबरोबर बारा प्रेषित


लूक ८:४
एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला,


लूक ८:१९
येशूची आई व त्याचे बंधू त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना.


लूक ८:२३
ते मचवा हाकारून पुढे जात असता येशू झोपी गेला. सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले त्यामुळे ते धोक्यात होते.


लूक ८:२६
येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले.


लूक ८:२८
येशूला पाहून तो ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो मला छळू नकोस.”


लूक ८:२९
कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.


लूक ८:३०
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “सैन्य”, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती.


लूक ८:३५
जे झाले ते पाहायला लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती, तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा त्यांना आढळला. त्यांना भीती वाटली.


लूक ८:३७
तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी येशूला तेथून निघून जाण्याची विनंती केली कारण ते फार घाबरले होते. तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.


लूक ८:३९
“आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला.


लूक ८:४०
नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते.


लूक ८:४१
तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.


लूक ८:४२
कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता.


लूक ८:४५
येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.”


लूक ८:४६
येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्‍ती निघाली, हे मला समजले आहे.”


लूक ८:४७
आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले.


लूक ८:५०
ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.”


लूक ९:१
नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला.


लूक ९:१०
प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला.


लूक ९:२८
ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला.


लूक ९:३१
ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते.


लूक ९:३२
पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते तरीही ते जागे राहिले होते म्हणून त्यांना येशूचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोघे पुरुष दिसले.


लूक ९:३३
ते दोघे येशूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरुवर्य, आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन तंबू तयार करतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” हे जे तो बोलला, त्याचे त्याला भान नव्हते.


लूक ९:३६
ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.


लूक ९:३७
दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले.


लूक ९:४१
येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व व़िकृत मनोवृत्तीच्या लोकांनो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू?” नंतर तो त्या माणसाला म्हणाला, “तुझ्या मुलाला इकडे आण.”


लूक ९:४२
तो जवळ येत आहे, इतक्यात भुताने त्याला आपटले व मूर्च्छित अवस्थेत टाकून दिले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला निघून जाण्याचा हुकूम सोडला आणि मुलाला बरे करून त्याच्या वडिलांजवळ परत दिले.


लूक ९:४३
अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले! बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,


लूक ९:४७
येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले.


लूक ९:५०
येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”


लूक ९:५१
वर घेतले जाण्याचा त्याचा समय जवळ आला, तेव्हा येशूने यरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले.


लूक ९:५३
परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता.


लूक ९:५६
नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले.


लूक ९:५७
ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”


लूक ९:६२
येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”


लूक १०:१६
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले, त्याचा अव्हेर करतो.”


लूक १०:२१
त्याच घटकेस येशू पवित्र आत्म्यात उल्हसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण असेच घडावे, अशी तुझी इच्छा होती.


लूक १०:२५
एकदा पाहा, एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरुवर्य, काय केल्याने मला शाश्वत जीवन हे वतन मिळेल?”


लूक १०:२९
परंतु आत्मसमर्थन करण्याच्या इच्छेने तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”


लूक १०:३०
येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहाण केली. त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.


लूक १०:३७
तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”


लूक १०:३८
येशू आणि त्याचे शिष्य पुढे जात असता तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.


लूक ११:१
एकदा येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने पूर्ण केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले, तसे आपणही आम्हांला शिकवा.”


लूक ११:५
पुढे येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन भाकरी उसन्या मागू लागतो,


लूक ११:१४
एकदा येशू एक भूत काढत होता व ते मुके होते. भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले.


लूक ११:२९
लोकसमुदाय एकत्र जमला तेव्हा येशू म्हणाला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्हाची अपेक्षा करते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दाखवले जाणार नाही.


लूक ११:३७
येशूचे प्रबोधन संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. तो भोजनाला बसला असता


लूक ११:५३
येशू तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्याच्यावर दबाव आणीत पुष्कळ गोष्टींविषयी त्याला चिथवू लागले.


लूक १२:१
त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा.


लूक १२:१३
लोकसमुदायातील एकाने येशूला म्हटले, “गुरुवर्य, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”


लूक १३:१
ज्या गालीलकरांचे रक्त पिलातने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला सांगितले.


लूक १३:६
येशूने त्यांना हा दाखला सांगितला:“कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला परंतु त्याला काही आढळले नाही.


लूक १३:१०
येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता.


लूक १३:१२
येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्‍त झाली आहेस.”


लूक १३:१४
येशूने साबाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “जेव्हा काम केले पाहिजे, असे सहा दिवस आहेत, तर त्या दिवसांत येऊन बरे व्हा. साबाथ दिवशी येऊ नका.”


लूक १४:१
येशू एका साबाथ दिवशी परुश्यांतील एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. काही लोक त्याच्या पाळतीवर बसले होते.


लूक १४:३
येशूने शास्त्र्यांना व परुश्यांना विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”


लूक १४:४
ते गप्प राहिले. येशूने त्या रुग्णाला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले.


लूक १४:५
नंतर येशू आजूबाजूच्या लोकांना म्हणाला, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला, तर तो त्याला साबाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”


लूक १४:७
आमंत्रित लोक मानाची आसने कशी निवडून घेत आहेत, हे पाहून येशू दाखला देऊन म्हणाला,


लूक १४:१२
त्यानंतर ज्याने त्याला आमंत्रण केले होते, त्यालादेखील येशू म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र, भाऊ, नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हांला आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.


लूक १४:२५
एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला,


लूक १५:१
एके दिवशी पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्याजवळ आले असता


लूक १५:११
नंतर येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते.


लूक १६:१
नंतर येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला: ‘एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक व्यवस्थापक होता. हा व्यवस्थापक तुमच्या संपत्तीचा दुरुपयोग करतो, असा आरोप त्याच्या मालकाजवळ करण्यात आला.


लूक १७:१
येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार!


लूक १७:११
येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला.


लूक १७:१३
ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.”


लूक १७:१६
येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता.


लूक १७:१७
येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत?


लूक १७:१९
येशूने त्याला म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”


लूक १८:१
शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा:


लूक १८:१५
येशूने स्पर्श करावा म्हणून काही लोकांनी त्यांची तान्ही बाळेदेखील त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले.


लूक १८:१६
तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


लूक १८:१८
एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”


लूक १८:१९
येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही.


लूक १८:२२
हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.”


लूक १८:२४
त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!


लूक १८:२९
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,


लूक १८:३५
येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता.


लूक १८:३७
त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.”


लूक १८:३८
तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”


लूक १८:३९
त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”


लूक १८:४०
तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले,


लूक १८:४२
येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”


लूक १९:१
येशूने यरीहो नगरात प्रवेश केला व तेथून तो पुढे जात होता.


लूक १९:३
येशू कोण आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता.


लूक १९:४
म्हणून पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता.


लूक १९:५
येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”


लूक १९:९
येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.


लूक १९:११
लोक ह्या गोष्टी ऐकत असता येशूने त्यांना एक दाखला सांगितला. कारण तो यरुशलेमजवळ पोहोचला होता आणि देवाचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे, असे त्यांना वाटत होते.


लूक १९:२८
ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता.


लूक १९:३५
त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले.


लूक १९:४१
येशू नगरीजवळ आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्याकरिता विलाप करीत म्हणाला,


लूक १९:४५
नंतर येशू मंदिरात गेला व तेथे जे विक्री करत होते, त्यांना तो बाहेर घालवू लागला.


लूक २०:१
एके दिवशी येशू मंदिरात शिकवण देत व शुभवर्तमान सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलजनांसह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले,


लूक २०:८
नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.”


लूक २०:९
येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला.


लूक २०:१५
त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील?”, येशूने विचारले.


लूक २०:१६
“तो येऊन त्या कुळांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांकडे सोपवून देईल”, येशूनेच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे ऐकून लोक म्हणाले, “असे न होवो.”


लूक २०:१७
येशूने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर मग ‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे’, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, त्याचा अर्थ काय?


लूक २०:२७
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले,


लूक २०:३४
येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात.


लूक २०:४१
त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात?


लूक २१:१
येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले.


लूक २१:५
सुरेख दगडांनी व देवाला समर्पित केलेल्या भेटवस्तूंनी मंदिर कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत होते. येशू म्हणाला,


लूक २१:२९
नंतर येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे ह्यांच्याकडे पहा.


लूक २१:३७
येशू दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात, तेथे राहात असे


लूक २२:२
मुख्य याजक व शास्त्री हे येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी विचार करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.


लूक २२:४
तो मुख्य याजक व मंदिराच्या रक्षकांचे अधिकारी ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरून द्यावे, ह्याविषयी त्याने त्यांच्याशी मसलत केली


लूक २२:६
त्याने होकार दिला आणि लोकांना कळणार नाही अशा वेळी त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.


लूक २२:८
येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”


लूक २२:१४
ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.


लूक २२:३५
नंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी तुम्हांला थैली, झोळी व वहाणा घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”


लूक २२:३६
येशू म्हणाला, “पण आता तर ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी. तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला कोट विकून ती विकत घ्यावी.


लूक २२:४३
[तेव्हा स्वर्गातील एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याने येशूला शक्ती दिली.


लूक २२:४४
त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्‍ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]


लूक २२:४७
येशू बोलत असतानाच लोकसमुदाय आला. यहुदा नावाचा बारामधला एक जण त्याचे नेतृत्व करीत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला.


लूक २२:४८
येशू त्याला म्हणाला, “यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”


लूक २२:५१
परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.


लूक २२:५२
जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडीलजन त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय?


लूक २२:५४
त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला.


लूक २२:५६
एका दासीने त्याला विस्तवाजवळ बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हादेखील येशूबरोबर होता.”


लूक २२:५९
सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणू लागला, “खरोखर हादेखील येशूबरोबर होता कारण हासुद्धा गालीलकर आहे!”


लूक २२:६३
ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.


लूक २३:१
ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूला पिलातकडे नेले.


लूक २३:८
येशूला पाहून हेरोदला फार आनंद झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे, अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. येशूच्या हातून घडलेले एखादे चिन्ह पाहायला मिळेल, अशी त्याला आशा होती.


लूक २३:९
त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही.


लूक २३:२०
येशूला सोडावे, ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्यासमोर बोलणी केली.


लूक २३:२५
नंतर बंड व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याच्यासाठी त्यांनी मागणी केली होती, त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या हवाली केले.


लूक २३:२६
शिपाई येशूला घेऊन जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर माणूस गावातून शहराकडे जात होता. त्याला त्यांनी वेठीस धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला तो येशूच्या मागे वाहण्यास लावले.


लूक २३:२७
येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता.


लूक २३:२८
येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा.


लूक २३:३२
येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले.


लूक २३:३३
ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले.


लूक २३:३४
[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]


लूक २३:३८
‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.


लूक २३:४२
तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.”


लूक २३:४३
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”


लूक २३:४६
मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला.


लूक २३:४९
ज्या स्त्रिया येशूच्या मागे गालीलहून आल्या होत्या त्यांच्यासह येशूला व्यक्तिशः ओळखणारे सर्व जण हे पाहत दूर उभे राहिले होते.


लूक २३:५२
त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह मागितला.


लूक २३:५५
गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले.


लूक २४:३
त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.


लूक २४:८
तेव्हा त्या स्त्रियांना येशूच्या शब्दांची आठवण झाली.


लूक २४:१३
त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते.


लूक २४:१५
ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला.


लूक २४:१७
येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले.


लूक २४:१९
तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्‍तीने पराक्रमी संदेष्टा होता.


लूक २४:२५
मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात!


लूक २४:२७
मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


लूक २४:२८
ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले.


लूक २४:३५
ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले.


लूक २४:३६
ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.”


लूक २४:४१
तरीही त्यांना विश्वास ठेवणे अवघड वाटत होते. मात्र ते हर्षभराने आश्चर्यचकित झाल्यामुळे येशूने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”


जॉन १:१७
नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.


जॉन १:२९
दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!


जॉन १:३६
आणि येशूला बाजूने चालत जाताना पाहून तो म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!”


जॉन १:३७
त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे गेले.


जॉन १:३८
येशूने वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हटले, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी (म्हणजे गुरुवर्य), आपण कोठे राहता?”


जॉन १:४०
योहानचे म्हणणे ऐकून येशूच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.


जॉन १:४२
नंतर अंद्रियाने शिमोनला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहत म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस, परंतु तुला केफा म्हणजेच पेत्र म्हणतील.”


जॉन १:४३
दुसऱ्या दिवशी येशूने गालीलमध्ये जायचे ठरवले तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”


जॉन १:४५
फिलिपला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात व संदेष्ट्यांनीसुद्धा लिहिले आहे, तो म्हणजे योसेफचा मुलगा, नासरेथकर येशू आम्हांला भेटला आहे.”


जॉन १:४७
नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, ह्याच्या मनात कपट नाही!”


जॉन १:४८
नथनेलने येशूला विचारले, “आपण मला कसे काय ओळखता?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले.”


जॉन १:५०
येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले, असे सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्यापेक्षा महान गोष्टी तू पाहशील.”


जॉन १:५१
आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”


जॉन २:१
तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.


जॉन २:२
येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते.


जॉन २:३
तेथे द्राक्षारस संपला असता येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”


जॉन २:४
येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”


जॉन २:७
येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले.


जॉन २:११
येशूने गालीलमधील काना येथे आपले हे पहिले चिन्ह करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.


जॉन २:१३
यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमला गेला.


जॉन २:१९
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन.”


जॉन २:२२
त्याने असे म्हटले होते, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी धर्मशास्त्रावर व येशूच्या वचनावर विश्वास ठेवला.


जॉन २:२४
पण येशूला सर्वांचे ज्ञान असल्यामुळे त्याचा त्यांच्यावर भरवसा नव्हता.


जॉन ३:२
तो एकदा रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाकडून आलेले गुरू आहात, हे आम्हांला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता, ती कोणालाही देव त्याच्या बरोबर असल्याशिवाय करता येणे शक्य नाही.”


जॉन ३:३
येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”


जॉन ३:५
येशूने उत्तर दिले, “मी तुला ठामपणे सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.


जॉन ३:१०
येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला हे समजत नाही काय?


जॉन ३:२२
ह्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात गेले. तेथे तो त्यांच्याबरोबर राहिला आणि तेथे त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला.


जॉन ४:१
येशू योहानपेक्षा अधिक शिष्य मिळवून त्यांना बाप्तिस्मा देत आहे, हे परुश्यांच्या कानी गेले आहे, असे जेव्हा प्रभूला कळले,


जॉन ४:२
(येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, पण त्याचे शिष्य देत असत.)


जॉन ४:६
तेथे याकोबची विहीर होती. प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.


जॉन ४:७
तेथे शोमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला दे.”


जॉन ४:१०
येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.”


जॉन ४:१३
येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.


जॉन ४:१७
ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “‘मला पती नाही’, हे तू खरे बोललीस,


जॉन ४:२१
येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान.


जॉन ४:२६
येशू तिला म्हणाला, “तुझ्याबरोबर बोलणारा मी, तो आहे.”


जॉन ४:३०
तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले.


जॉन ४:३४
येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे.


जॉन ४:३९
“मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले”, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.


जॉन ४:४३
तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू तेथून गालीलमध्ये निघून गेला.


जॉन ४:४४
कारण येशूने स्वतः ठामपणे म्हटले होते, “संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.”


जॉन ४:४७
येशू यहुदियातून गालीलमध्ये आला आहे, हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, “आपण येऊन मरणास टेकलेल्या माझ्या मुलाला बरे करावे.”


जॉन ४:४८
येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुत गोष्टी पाहिल्यावाचून विश्वास ठेवणार नाही.


जॉन ४:५०
येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे!” तो मनुष्य येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून निघून गेला.


जॉन ४:५३
ह्यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा वाचला आहे’, त्याच वेळी हे झाले, हे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने येशूवर विश्वास ठेवला.


जॉन ४:५४
येशूने यहुदियातून गालीलमध्ये आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होते.


जॉन ५:१
ह्यानंतर यहुदी लोकांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमला गेला.


जॉन ५:६
येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?”


जॉन ५:८
येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.”


जॉन ५:१३
तो कोण आहे, हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी गर्दी होती व येशू तेथून निघून गेला होता.


जॉन ५:१४
त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”


जॉन ५:१५
त्या माणसाने जाऊन यहुदी लोकांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”


जॉन ५:१६
त्यामुळे ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने साबाथ दिवशी हे काम केले होते.


जॉन ५:१७
परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अजून काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”


जॉन ५:१९
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो;


जॉन ६:१
ह्यानंतर येशू गालीलच्या म्हणजे तिबिर्या सरोवराच्या पलीकडे गेला.


जॉन ६:३
येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.


जॉन ६:५
येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे लोकसमुदाय येत आहे असे पाहून, फिलिपला म्हणाला, “ह्यांना भोजन द्यायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?”


जॉन ६:१०
येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते म्हणून सर्व लोक बसले. तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते.


जॉन ६:११
येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.


जॉन ६:१५
त्यानंतर लोक येऊन आपल्याला राजा करण्याकरता बळजबरीने धरून नेण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.


जॉन ६:१७
ते मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे कफर्णहूमला जाऊ लागले. अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता.


जॉन ६:१९
मचवा सुमारे पाच-सहा किलोमीटर वल्हवून नेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून मचव्यापर्यंत चालत येताना पाहिले आणि त्यांचा थरकाप उडाला.


जॉन ६:२२
दुसऱ्या दिवशी, सरोवराच्या दुसऱ्या बाजूला जमलेल्या लोकांच्या लक्षात आले की, ज्या मचव्यात त्याचे शिष्य चढले होते त्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता. येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात चढला नव्हता, तर त्याचे शिष्य एकटे निघून गेले होते.


जॉन ६:२४
तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत, असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्या लहान मचव्यांत बसून येशूचा शोध घेत कफर्णहूमला आले.


जॉन ६:२६
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता.


जॉन ६:२९
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”


जॉन ६:३२
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो.


जॉन ६:३५
येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही.


जॉन ६:४२
ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?”


जॉन ६:४३
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका.


जॉन ६:५३
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्‍त पीत नाही, तोवर तुम्हांला जीवन मिळणार नाही.


जॉन ६:६१
आपले शिष्य ह्याविषयी वितंडवाद करत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुमच्या मनात शंका दाटली आहे काय?


जॉन ६:६४
तरी पण विश्वास ठेवत नाहीत, असे तुमच्यात कित्येक आहेत.” विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण, हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते.


जॉन ६:६७
म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?”


जॉन ६:७०
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यापैकी एक जण सैतान आहे.”


जॉन ७:१
त्यानंतर येशू गालीलमध्ये फिरू लागला, यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही.


जॉन ७:६
येशू त्यांना म्हणाला, “माझी उचित वेळ अजून आली नाही, तुमची वेळ तर नेहमीच उचित असते.


जॉन ७:१४
सणाचे सुमारे अर्धे दिवस संपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवण देऊ लागला.


जॉन ७:१६
त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे.


जॉन ७:२१
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्यचकित झाला आहात.


जॉन ७:२८
नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही.


जॉन ७:३२
लोकसमुदाय येशूविषयी अशी कुजबुज करीत आहे, हे परुश्यांच्या कानावर गेले म्हणून त्यांनी व मुख्य याजकांनी त्याला अटक करण्याकरता काही अधिकारी पाठवले.


जॉन ७:३३
मग येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन व नंतर ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाईन.


जॉन ७:३७
सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.


जॉन ७:३९
त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता.


जॉन ७:५०
येशूकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला,


जॉन ८:१
येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला.


जॉन ८:६
त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला.


जॉन ८:९
हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती.


जॉन ८:१०
येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?”


जॉन ८:११
ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]


जॉन ८:१२
येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


जॉन ८:१४
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कुठे जातो, हे मला ठाऊक आहे. मी कुठून आलो व कुठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही.


जॉन ८:१९
ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “तुमचा पिता कुठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”


जॉन ८:२१
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जाईन आणि तुम्ही मला शोधाल परंतु तुम्ही तुमच्या पापांत मराल. मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”


जॉन ८:२३
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात परंतु मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात परंतु मी ह्या जगाचा नाही.


जॉन ८:२५
त्यांनी त्याला विचारले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.


जॉन ८:२८
म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, तेव्हा तुम्हांला कळेल की, मी तो आहे. मी स्वतःच्या अधिकाराने काही करत नाही. तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.


जॉन ८:३१
नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.


जॉन ८:३३
त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?”


जॉन ८:३४
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो.


जॉन ८:३९
त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर अब्राहामची मुले असता, तर तुम्ही अब्राहामने केली तशी कृत्ये केली असती.


जॉन ८:४२
येशूने त्यांना म्हटले, “परमेश्वर जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवाकडून आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे.


जॉन ८:४८
यहुदी लोकांनी येशूला विचारले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो, ते बरोबर आहे की नाही?”


जॉन ८:४९
येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही, तर मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही मात्र माझा अपमान करता.


जॉन ८:५४
येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला, तर त्याला काही अर्थ नाही. माझा गौरव करणारा माझा पिता आहे व त्याच्याविषयी ‘तो आमचा देव आहे’, असे तुम्ही म्हणता.


जॉन ८:५८
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, अब्राहाम होता त्यापूर्वी मी आहे.”


जॉन ८:५९
ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले, परंतु येशू लपून राहिला व नंतर मंदिरातून निघून गेला.


जॉन ९:१
रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले.


जॉन ९:३
येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी.


जॉन ९:११
त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने माती ओली करून माझ्या डोळ्यांना लावली आणि मला सांगितले, ‘शिलोहवर जाऊन धुऊन घे.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”


जॉन ९:१४
ज्या दिवशी येशूने माती ओली करून त्याचे डोळे उघडले तो साबाथ होता.


जॉन ९:१५
म्हणून परुश्यांनीदेखील त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी मिळाली?” तो त्यांना म्हणाला, “येशूने माझ्या डोळ्यांना ओली माती लावली, ती मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”


जॉन ९:३५
त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले, तेव्हा त्याने त्याला शोधून काढले व म्हटले, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का?”


जॉन ९:३७
येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तोच तुझ्याबरोबर आता बोलत आहे.”


जॉन ९:३९
तेव्हा येशू म्हणाला, “मी ह्या जगात न्यायनिवाड्यासाठी आलो आहे, ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”


जॉन ९:४१
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्हांला दोषी ठरवण्यात आले नसते, परंतु तुम्हांला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”


जॉन १०:१
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो मेंढवाड्यात दारातून न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असतो.


जॉन १०:६
हा दाखला येशूने त्यांना सांगितला. परंतु येशू त्यांना जे सांगत होता, ते त्यांना समजले नाही.


जॉन १०:७
म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी मेंढरांसाठी दार आहे.


जॉन १०:२३
मंदिरात शलमोनच्या देवडीत येशू फिरत होता.


जॉन १०:२५
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो, ती माझ्याविषयी साक्ष देतात.


जॉन १०:३२
येशू त्यांना म्हणाला, “पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये मी तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यांकरता तुम्ही मला दगड मारत आहात?”


जॉन १०:३४
येशूने त्यांना म्हटले, ““तुम्ही देव आहात, असे मी म्हणतो’, हे तुमच्या धर्मशास्त्रात लिहिले नाही काय?


जॉन ११:३
त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.”


जॉन ११:४
ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”


जॉन ११:५
मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती.


जॉन ११:६
तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.


जॉन ११:९
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो.


जॉन ११:१३
येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.


जॉन ११:१४
म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.”


जॉन ११:१७
येशू बेथानीला आला तेव्हा त्याला कळले की, लाजरला कबरीत ठेवून चार दिवस झाले होते.


जॉन ११:२०
येशू येत आहे, हे ऐकताच मार्था बाहेर जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली.


जॉन ११:२१
मार्था येशूला म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.


जॉन ११:२३
येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”


जॉन ११:२५
येशूने तिला म्हटले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल.


जॉन ११:३०
येशू अजून गावात आला नव्हता पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता.


जॉन ११:३२
येशू होता तेथे मरिया गेली आणि त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ आम्हांला सोडून गेला नसता.”


जॉन ११:३३
येशूने तिला व तिच्याबरोबर आलेल्या लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात कळवळला व व्याकूळ होऊन म्हणाला,


जॉन ११:३५
येशू रडला.


जॉन ११:३८