मॅथ्यू २:१५ |
हेरोदच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे”, हे भाकीत पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
|
मॅथ्यू ४:१६ |
अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे.
|
मॅथ्यू १६:१८ |
आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही.
|
मार्क ९:३१ |
तो त्याच्या शिष्यांना शिकवत असे, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील आणि मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
|
लूक ९:३१ |
ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते.
|
लूक २२:२२ |
मनुष्याचा पुत्र अगोदरच ठरविण्यात आल्याप्रमाणे मृत्यू स्वीकारतो खरा परंतु जो त्याचा विश्वासघात करतो, त्याचा धिक्कार असो!”
|
रोमन्स ४:२५ |
तुमच्या आमच्या अपराधांसाठी येशूने मृत्यू स्वीकारावा म्हणून त्याला धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मरणातून उठवला गेला.
|
रोमन्स ६:१० |
आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो.
|
१ करिंथकर १५:२६ |
जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.
|
१ करिंथकर १५:३१ |
बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो!
|
२ करिंथकर २:१६ |
नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे?
|
२ करिंथकर ३:७ |
ज्याचा लेख दगडांवर कोरलेला असून ज्याचा शेवट मृत्यूत होत असे, ते सेवाकार्य एवढे तेजस्वी होते की, मोशेच्या मुखावरचे तेज नाहीसे होत चालले असतानाही इस्राएली लोकांना जर त्याच्या मुखाकडे टक लावून पाहवेना,
|
२ करिंथकर ११:२३ |
ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.
|
फिलिपीन्स ३:१० |
माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे.
|
फिलिपीन्स ३:१८ |
मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत.
|
इब्री ७:२३ |
दुसरा फरक म्हणजे इतर पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे;
|
इब्री ९:१५ |
ह्याच कारणाकरिता ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ आहे त्यामुळे पाचारण झालेल्यांना शाश्वत वारशाचे अभिवचन मिळावे. हे शक्य आहे कारण पहिल्या कराराखाली झालेल्या उ्रंघनापासून खंडणी भरून मुक्ती मिळावी म्हणून एक मृत्यू झालेला आहे.
|
इब्री ९:१६ |
मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे.
|
इब्री ९:१७ |
मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्रकर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात येणार नाही.
|
प्रकटीकरण १:१८ |
मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
|
प्रकटीकरण ५:९ |
ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत
|
प्रकटीकरण ६:८ |
मग मी पाहिले, तो फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तलवारीने, दुष्काळाने, रोगराईने व पृथ्वीवरील हिंस्र श्वापदांकडून माणसांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला.
|
प्रकटीकरण २०:१३ |
त्यानंतर समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर टाकले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्या हाती असलेल्या मृतांना बाहेर सोडले. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.
|
प्रकटीकरण २०:१४ |
तेव्हा मृत्यू व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |