Matteuksen 6:12 |
आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर
|
Matteuksen 6:14 |
जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील.
|
Matteuksen 6:15 |
परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
|
Matteuksen 9:2 |
त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”
|
Matteuksen 9:5 |
कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते?
|
Matteuksen 9:6 |
पण मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायचा अधिकार पृथ्वीवर आहे, हे तुम्हांला समजावे.” मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, तुझी खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”
|
Matteuksen 12:31 |
म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही.
|
Matteuksen 12:32 |
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.
|
Matteuksen 18:21 |
त्या वेळी पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”
|
Matteuksen 18:35 |
म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”
|
लूक १:७७ |
त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील.
|
लूक ५:२० |
त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “मित्रा, तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”
|
लूक ५:२१ |
तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?”
|
लूक ५:२३ |
‘तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे’ किंवा ‘उठून चाल’, ह्यातले कोणते म्हणणे सोपे आहे?
|
लूक ५:२४ |
तथापि पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याच्या पुत्राला आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून” - तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, - “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन घरी जा.”
|
लूक ६:३७ |
तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमा मिळेल.
|
लूक ७:४७ |
म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.”
|
लूक ७:४८ |
मग त्याने तिला म्हटले,”तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”
|
लूक ७:४९ |
तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?”
|
लूक ११:४ |
आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.”
|
लूक १२:१० |
जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल, त्याला क्षमा मिळेल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो, त्याला क्षमा मिळणार नाही.
|
लूक १४:१८ |
ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
|
लूक १४:१९ |
दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
|
लूक १७:३ |
तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.
|
लूक १७:४ |
त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.”
|
लूक २३:३४ |
[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]
|
लूक २४:४७ |
आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
|
Johanneksen 20:23 |
ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल आणि ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करणार नाही त्यांची क्षमा केली जाणार नाही.”
|
रोमन्स ३:२५ |
त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.
|
रोमन्स ४:७ |
ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य!
|
२ करिंथकर २:७ |
म्हणून आता तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, म्हणजे तो अतिदुःखात बुडून जाऊ नये.
|
२ करिंथकर २:१० |
ज्या कोणाला तुम्ही क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो. मी क्षमा केली असली, तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे.
|
२ करिंथकर १२:१३ |
मी आपला आर्थिक भार तुमच्यावर लादला नाही, ही बाब सोडली तर इतर ख्रिस्तमंडळ्यांपेक्षा तुमची दुरावस्था झाली काय? माझ्या ह्या दुष्कृत्याबद्दल मला क्षमा करा!
|
इफिसियन्स १:७ |
त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.
|
इफिसियन्स ४:३२ |
उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
|
कलस्सियन १:१४ |
त्या पुत्रामध्ये, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांबद्दल आपल्याला क्षमा मिळाली आहे.
|
कलस्सियन २:१३ |
तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले.
|
कलस्सियन ३:१३ |
एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करावयास हवी.
|
२ तीमथ्य ३:३ |
ममताहीन, क्षमा न करणारी, निंदक, असंयमी, उग”, चांगुलपणाचा द्वेष करणारी,
|
इब्री १:३ |
तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.
|
इब्री ८:१२ |
मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही.
|
इब्री ९:२२ |
नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही.
|
इब्री १०:१८ |
तर मग ज्याअर्थी त्यांना क्षमा झाली त्याअर्थी त्यांच्या पापांबद्दल अर्पण नाही.
|
इब्री १०:२८ |
मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला, तर त्याला क्षमा न होता दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.
|
इब्री १३:११ |
यहुदी प्रमुख याजक आपल्या पापांबद्दल क्षमा मिळावी म्हणून पशूंचे रक्त पवित्र स्थानात घेऊन जातात परंतु त्या पशूंची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात.
|
जेम्स ५:१५ |
श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल.
|
जेम्स ५:२० |
तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून जो परत फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व अनेक पापांबद्दल क्षमा मिळवील, हे लक्षात ठेवा.
|
१ योहान १:९ |
मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.
|
१ योहान २:२ |
आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते.
|
१ योहान २:१२ |
मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे.
|
१ योहान ४:१० |
प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |