A A A A A


शोधा

लूक १:२८
देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर आहे.”


लूक १:३०
देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे


लूक १:४८
कारण त्याने त्याच्या सेविकेच्या नम्रतेवर कृपादृष्टी वळवली आहे! ह्यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;


लूक १:५०
जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते.


लूक १:६८
‘इस्राएलचा प्रभू परमेश्वर ह्याचा आपण गौरव करू या. त्याने लोकांवर कृपादृष्टी वळवली असून त्याने त्यांचे तारण केले आहे.


लूक २:१४
“स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.”


लूक २:४०
ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती.


लूक २:५२
येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.


लूक ४:२२
सर्व त्याची वाहवा करू लागले. जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी ते आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा मुलगा ना?”


लूक ९:३८
तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे.


लूक १९:४४
तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


जॉन १:१४
शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.


जॉन १:१६
त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.


जॉन १:१७
नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.


जॉन ४:४९
तो अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभो, माझा मुलगा मरण्यापूर्वी माझ्याबरोबर येण्याची कृपा करा.”


कायदे ४:३०
आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.”


कायदे ४:३३
प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती.


कायदे ६:८
परमेश्वराची कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण झालेला स्तेफन लोकांत मोठे चमत्कार व चिन्हे करीत असे.


कायदे ७:४६
दावीदवर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबच्या घराण्याच्या परमेश्वरासाठी वसतिस्थान तयार करता यावे म्हणून परमेश्वराकडे याचना केली.


कायदे ११:२३
तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.”


रोमन्स १:५
त्याच्याद्वारे मला कृपा व प्रेषितपदही मिळाले, अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


रोमन्स १:७
म्हणून रोममधील तुम्हां श्रद्धावंतांना मी लिहीत आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने त्याची प्रजा होण्यासाठी तुम्हांला आमंत्रित केले आहे. त्या तुम्हांला देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती मिळो.


रोमन्स १:११
तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे.


रोमन्स ५:१५
परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता फारच अधिक प्रमाणात विपुल झाली


रोमन्स ५:१६
आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. परंतु कृपादानामुळे सर्व निर्दोषी ठरवले जातात.


रोमन्स ५:२०
नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली.


रोमन्स ५:२१
तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.


रोमन्स ६:१
तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?


रोमन्स ६:२३
पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.


रोमन्स ११:६
आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही.


रोमन्स ११:२९
देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही.


रोमन्स १२:३
मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा.


रोमन्स १२:६
आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेनुसार आपल्याला विविध कृपादाने मिळाली आहेत. आपल्या विश्वासाच्या प्रमाणात संदेश देणाऱ्याने संदेश देण्यात,


रोमन्स १२:८
बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी.


रोमन्स १६:२०
शांतिदाता देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.


रोमन्स १६:२४
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.


१ करिंथकर १:३
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो.


१ करिंथकर १:७
परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.


१ करिंथकर ७:७
खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.


१ करिंथकर १२:४
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो.


१ करिंथकर १२:९
एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने,


१ करिंथकर १२:१०
अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात.


१ करिंथकर १२:११
ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.


१ करिंथकर १२:२८
देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक, नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


१ करिंथकर १२:३०
आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?


१ करिंथकर १२:३१
परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो.


१ करिंथकर १३:२
संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे.


१ करिंथकर १३:८
प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल;


१ करिंथकर १४:३२
संदेश देण्याचे कृपादान संदेष्ट्याच्या स्वाधीन असते.


१ करिंथकर १५:१०
तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.


१ करिंथकर १६:२३
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह सर्वांवर असो.


२ करिंथकर १:२
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून तुम्हांला कृपा व शांती मिळो.


२ करिंथकर १:१५
अशी खातरी बाळगून तुम्हांला दुप्पट कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे,


२ करिंथकर ४:१५
हे सर्व काही तुमच्याकरिता आहे आणि देवाची कृपा जशी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तशी ते देवाच्या गौरवासाठी अधिक आभारप्रदर्शनात्मक प्रार्थना करतील.


२ करिंथकर ८:४
त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.


२ करिंथकर ८:९
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


२ करिंथकर ९:१४
तुमच्यावर देवाची अपार कृपा झाली आहे म्हणून ते तुमच्याकरिता मोठ्या आत्मीयतेने प्रार्थना करतात.


२ करिंथकर ११:३१
प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.


२ करिंथकर १२:९
परंतु त्याने मला म्हटले, ‘माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस पोहचते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


२ करिंथकर १३:१४
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांबरोबर राहो.


गलतीकर १:३
आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो.


गलतीकर २:९
मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे.


गलतीकर ३:१८
कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण देवाने मात्र ते अब्राहामला अभिवचनाद्वारे कृपादान म्हणून दिले आहे.


गलतीकर ६:१८
बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो. आमेन.


इफिसियन्स १:२
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


इफिसियन्स ३:२
मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे.


इफिसियन्स ३:८
सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे


इफिसियन्स ४:७
आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या कृपादानाच्या प्रमाणात विशिष्ट वरदान प्राप्त झाले आहे.


इफिसियन्स ४:२९
तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.


इफिसियन्स ६:२४
आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अमर प्रीती करतात, त्या सर्वांवर देवाची कृपा राहो.


फिलिपीन्स १:२
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला मिळो.


फिलिपीन्स १:२९
कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.


फिलिपीन्स ४:२३
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो.


कलस्सियन १:२
देव आपला पिता तुम्हांला कृपा व शांती देवो.


कलस्सियन १:६
तुम्ही हे शुभवर्तमान ऐकले व खरेपणाने त्या दिवसापासून जसे तुमच्यामध्ये तसेच सर्व जगातही हे शुभवर्तमान फळ देत आहे व पसरत चालले आहे. तुम्ही देवाची कृपा सत्यस्वरूपात जाणून घेतली आहे.


कलस्सियन १:७
आमचा प्रिय सहकारी दास, एपफ्रास हा आमच्या वतीने तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू प्रसेवक असून त्याच्याकडून तुम्ही ही कृपा जाणून घेतली.


कलस्सियन ४:१८
मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो.


२ थेस्सलनीकाकर १:२
देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


२ थेस्सलनीकाकर ३:१८
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.


१ तीमथ्य १:२
देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो.


१ तीमथ्य ४:१४
तुझ्यावर वडीलजनांनी हात ठेऊन प्रार्थना केली, त्या वेळी संदेशाद्वारे मिळालेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.


१ तीमथ्य ६:२१
कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.


टायटस १:४
हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे. देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


टायटस २:११
सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की,


टायटस ३:१५
माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव. तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो.


फिलेमोन १:३
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


फिलेमोन १:२५
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.


इब्री ४:१६
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.


इब्री १३:२५
तुम्हां सर्वांवर देवाची कृपा राहो.


जेम्स ४:६
देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’.


१ पीटर १:२
देवपित्याच्या योजनेनुसार तुम्ही निवडलेले आहात. तुम्हांला पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करून त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


१ पीटर २:२
प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नव्याने जन्मलेल्या बालकासारखे निरश्या दुधाची इच्छा धरा.


१ पीटर ४:१०
प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रणाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.


१ पीटर ५:५
तसेच तरुणांनो, वडीलजनांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो.


१ पीटर ५:१०
आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल.


१ पीटर ५:१२
माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


२ पीटर १:२
देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


२ योहान १:३
देवपित्याकडून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडून सत्यात व प्रीतीत आपल्याला कृपा, दया व शांती मिळो.


प्रकटीकरण १:५
आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे


प्रकटीकरण २२:२१
प्रभू येशूची कृपा सर्वांबरोबर असो. आमेन.


Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India