A A A A A


शोधा

Lukas 4:18
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


कायदे १:२४
मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू,


कायदे २:२६
म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील.


कायदे ७:५१
अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.


कायदे १५:८
आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.


रोमन्स ९:१८
ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’


कलस्सियन ३:१२
तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;


१ थेस्सलनीकाकर २:१७
बंधुजनहो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला विरहदुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;


इब्री ८:१०
कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.


इब्री १०:१६
परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”


इब्री १०:२२
म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


२ पीटर २:१४
त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India