मॅथ्यू २:१० |
तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला;
|
मॅथ्यू ५:१२ |
आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
|
मॅथ्यू १३:२० |
खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो;
|
मॅथ्यू १३:४४ |
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
|
मॅथ्यू १८:१३ |
आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचीत सांगतो.
|
मॅथ्यू २५:२१ |
त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
|
मॅथ्यू २५:२३ |
त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
|
मार्क ४:१६ |
तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;
|
मार्क ६:२० |
कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.
|
मार्क १४:११ |
त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले; तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोईस्कर संधी पाहू लागला.
|
लूक १:१४ |
त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील.
|
लूक १:५८ |
प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले.
|
लूक २:१० |
तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो;
|
लूक ६:२३ |
त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
|
लूक ८:१३ |
खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.
|
लूक १०:१७ |
नंतर ते बाहत्तर1 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
|
लूक १०:२० |
तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.”
|
लूक १२:१९ |
मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’
|
लूक १३:१७ |
तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
|
लूक १५:५ |
ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो;
|
लूक १५:६ |
आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
|
लूक १५:७ |
त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.
|
लूक १५:९ |
ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
|
लूक १५:१० |
त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”
|
लूक १५:२३ |
आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू;
|
लूक १५:२४ |
कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले.
|
लूक १५:२९ |
परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.
|
लूक १५:३२ |
तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’
|
लूक १९:६ |
तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
|
लूक १९:३७ |
तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,
|
लूक २२:५ |
तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.
|
लूक २४:४१ |
मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”
|
लूक २४:५२ |
तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले;
|
जॉन ३:२९ |
वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
|
जॉन ४:३६ |
कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा.
|
जॉन ११:१५ |
आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.”
|
जॉन १४:२८ |
‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
|
जॉन १५:११ |
माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
|
जॉन १६:२० |
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
|
जॉन १६:२१ |
स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही.
|
जॉन १६:२२ |
ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही.
|
जॉन १६:२४ |
तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
|
जॉन १७:१३ |
पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो.
|
जॉन २०:२० |
असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
|
कायदे २:२६ |
म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील.
|
कायदे ५:४१ |
ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.
|
कायदे ७:४१ |
मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.
|
कायदे ८:८ |
आणि त्या नगरात आनंदीआनंद झाला.
|
कायदे १२:१४ |
तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की, ‘पेत्र दाराशी उभा आहे.’
|
कायदे १३:४८ |
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला.
|
कायदे १३:५२ |
इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
|
कायदे १५:३ |
मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
|
कायदे १५:३१ |
त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
|
कायदे १६:३४ |
मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.
|
कायदे २१:१७ |
यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले.
|
रोमन्स १२:१५ |
आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा.
|
रोमन्स १४:१७ |
कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे.
|
रोमन्स १५:१३ |
आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हांला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
|
रोमन्स १५:३२ |
अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी.
|
रोमन्स १६:१९ |
तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.
|
१ करिंथकर ७:३० |
जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे; जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपल्याजवळ काही नसल्यासारखे;
|
१ करिंथकर १२:२६ |
एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
|
१ करिंथकर १३:६ |
ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते;
|
१ करिंथकर १६:१७ |
स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे.
|
२ करिंथकर १:२४ |
आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.
|
२ करिंथकर २:२ |
कारण जर मी तुम्हांला दु:ख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दु:ख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे?
|
२ करिंथकर २:३ |
तुम्हांला मी हेच लिहिले होते, ह्यासाठी की, मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये; मला तुम्हा सर्वांविषयी असा भरवसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.
|
२ करिंथकर ६:१० |
दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.
|
२ करिंथकर ७:४ |
मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे; आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे.
|
२ करिंथकर ७:७ |
आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था ह्यांसंबंधाने आम्हांला सांगत असताना, तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला.
|
२ करिंथकर ७:९ |
तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले.
|
२ करिंथकर ७:१३ |
ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.
|
२ करिंथकर ७:१६ |
मला सर्व बाबतींत तुमचा भरवसा वाटतो म्हणून मी आनंद करतो.
|
२ करिंथकर ८:२ |
ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.
|
२ करिंथकर ११:१९ |
कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूढांचे सहन करता.
|
२ करिंथकर १२:९ |
परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.
|
२ करिंथकर १२:१५ |
मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?
|
२ करिंथकर १३:९ |
जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
|
गलतीकर ४:२७ |
शास्त्रात असे लिहिले आहे, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.”
|
गलतीकर ५:२२ |
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
|
फिलिपीन्स १:४ |
पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो.
|
फिलिपीन्स १:१८ |
ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच.
|
फिलिपीन्स १:२५ |
मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे;
|
फिलिपीन्स २:२ |
तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
|
फिलिपीन्स २:१७ |
तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
|
फिलिपीन्स २:१८ |
आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
|
फिलिपीन्स २:२८ |
म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
|
फिलिपीन्स २:२९ |
ह्यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा;
|
फिलिपीन्स ३:१ |
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.
|
फिलिपीन्स ४:१ |
म्हणून प्रियजनहो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
|
फिलिपीन्स ४:४ |
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.
|
फिलिपीन्स ४:१० |
मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती.
|
कलस्सियन १:११ |
सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे;
|
कलस्सियन १:२४ |
तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;
|
कलस्सियन २:५ |
तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.
|
१ थेस्सलनीकाकर १:६ |
तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;
|
१ थेस्सलनीकाकर २:१९ |
कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना?
|
१ थेस्सलनीकाकर २:२० |
कारण तुम्ही आमचा गौरव व आमचा आनंद आहात.
|
१ थेस्सलनीकाकर ३:९ |
कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्यासंबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत?
|
१ थेस्सलनीकाकर ५:१६ |
सर्वदा आनंदित असा;
|
२ तीमथ्य १:३ |
मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.
|
फिलेमोन १:७ |
तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.
|
इब्री १०:३४ |
कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.
|
इब्री १२:२ |
आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.
|
इब्री १२:११ |
कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.
|
इब्री १३:१७ |
आपल्या अधिकार्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
|
जेम्स १:२ |
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.
|
जेम्स ४:९ |
कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.
|
जेम्स ५:१३ |
तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.
|
१ पीटर १:८ |
त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.
|
१ पीटर ४:१३ |
ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा; म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.
|
१ योहान १:४ |
तुमचाआमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो.
|
२ योहान १:४ |
आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.
|
२ योहान १:१२ |
मला तुम्हांला पुष्कळ लिहायचे होते, ते कागद व शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही; तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो; म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.
|
३ योहान १:४ |
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही.
|
प्रकटीकरण ११:१० |
आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्यांना पीडा दिली होती.
|
प्रकटीकरण १८:२० |
‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’
|
प्रकटीकरण १९:७ |
आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे,
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |