A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

Судије ३1
इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी
2
आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही:
3
पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.
4
परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
5
अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यामध्ये राहू लागले.
6
ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो
7
इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले;
8
म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.
9
इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
10
त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.
11
त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो
12
पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले; त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्राएलावर वर्चस्व स्थापले.
13
तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले.
14
म्हणून इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे अठरा वर्षे दास्य केले.
15
मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडवणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठवला.
16
एहूदने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकवली.
17
त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे नजराणा सादर केला; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
18
नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली;
19
पण गिलगालाजवळील पाषाणमूर्तींपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, “महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.” राजा म्हणाला, “गप्प राहा.” तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.
20
एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” तेव्हा तो आसनावरून उठला.
21
मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली;
22
पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती.
23
मग बाहेर देवडीवर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे लावून कुलूप लावले.
24
तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तर माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले; तेव्हा त्यांना वाटले की, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.
25
ते वाट पाहून थकले; तो माडीचे दरवाजे उघडत नाहीत असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर, त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
26
ते वाट पाहत होते तितक्यात एहूद पळून पाषाणमूर्तींच्या पलीकडे सईरा येथे जाऊन पोहचला.
27
तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.
28
तो त्यांना म्हणाला, “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.” तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.
29
त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही वाचला नाही.
30
अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या काबूत आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे स्वास्थ्य लाभले.
31
एहूदनंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची सुटका केली.Судије ३:1

Судије ३:2

Судије ३:3

Судије ३:4

Судије ३:5

Судије ३:6

Судије ३:7

Судије ३:8

Судије ३:9

Судије ३:10

Судије ३:11

Судије ३:12

Судије ३:13

Судије ३:14

Судије ३:15

Судије ३:16

Судије ३:17

Судије ३:18

Судије ३:19

Судије ३:20

Судије ३:21

Судије ३:22

Судије ३:23

Судије ३:24

Судије ३:25

Судије ३:26

Судије ३:27

Судије ३:28

Судије ३:29

Судије ३:30

Судије ३:31Судије 1 / Суд 1

Судије 2 / Суд 2

Судије 3 / Суд 3

Судије 4 / Суд 4

Судије 5 / Суд 5

Судије 6 / Суд 6

Судије 7 / Суд 7

Судије 8 / Суд 8

Судије 9 / Суд 9

Судије 10 / Суд 10

Судије 11 / Суд 11

Судије 12 / Суд 12

Судије 13 / Суд 13

Судије 14 / Суд 14

Судије 15 / Суд 15

Судије 16 / Суд 16

Судије 17 / Суд 17

Судије 18 / Суд 18

Судије 19 / Суд 19

Судије 20 / Суд 20

Судије 21 / Суд 21