A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

प्रकटीकरण १०मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.
त्याच्या हाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला.
सिंहगर्जनेप्रमाणे तो ओरडला, तेव्हा सात मेघगर्जनांचा निनाद ऐकू आला.
त्या सात मेघगर्जनांचा अर्थ मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांचा अर्थ तू गुप्त ठेव, तो लिहू नकोस.”
ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला
आणि जो युगानुयुगे जिंवत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, भूमी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, “आणखी वेळ लागणार नाही.
परंतु सातवा देवदूत कर्णा वाजवील तेव्हा देवाने आपले संदेष्टे सेवक ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्याची गुप्त योजना पूर्ण होईल.”
स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.”
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन “ती लहानशी गुंडाळी मला दे”, असे म्हटले. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट बिघडवेल परंतु तुझ्या तोंडाला मधासारखी गोड लागेल.”
१०
तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी ती खाल्ल्यावर माझ्या पोटात बिघाड झाला.
११
तेव्हा मला सांगण्यात आले की, अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे ह्यांना तू पुन्हा देवाचा संदेश दिला पाहिजे.प्रकटीकरण १०:1
प्रकटीकरण १०:2
प्रकटीकरण १०:3
प्रकटीकरण १०:4
प्रकटीकरण १०:5
प्रकटीकरण १०:6
प्रकटीकरण १०:7
प्रकटीकरण १०:8
प्रकटीकरण १०:9
प्रकटीकरण १०:10
प्रकटीकरण १०:11


प्रकटीकरण 1 / प्रकटी 1
प्रकटीकरण 2 / प्रकटी 2
प्रकटीकरण 3 / प्रकटी 3
प्रकटीकरण 4 / प्रकटी 4
प्रकटीकरण 5 / प्रकटी 5
प्रकटीकरण 6 / प्रकटी 6
प्रकटीकरण 7 / प्रकटी 7
प्रकटीकरण 8 / प्रकटी 8
प्रकटीकरण 9 / प्रकटी 9
प्रकटीकरण 10 / प्रकटी 10
प्रकटीकरण 11 / प्रकटी 11
प्रकटीकरण 12 / प्रकटी 12
प्रकटीकरण 13 / प्रकटी 13
प्रकटीकरण 14 / प्रकटी 14
प्रकटीकरण 15 / प्रकटी 15
प्रकटीकरण 16 / प्रकटी 16
प्रकटीकरण 17 / प्रकटी 17
प्रकटीकरण 18 / प्रकटी 18
प्रकटीकरण 19 / प्रकटी 19
प्रकटीकरण 20 / प्रकटी 20
प्रकटीकरण 21 / प्रकटी 21
प्रकटीकरण 22 / प्रकटी 22