A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

प्रकटीकरण १येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले.
योहानने जे जे पाहिले आहे, ते सर्व सांगितले आहे. देवाकडून मिळालेला संदेश व येशू ख्रिस्ताने उघड करून दाखविलेले सत्य यांविषयीचा हा योहानचा वृत्तान्त आहे.
ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे.
योहानकडून आशिया प्रांतातील सात ख्रिस्तमंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्याकडून; त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्याकडून
आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे
आणि ज्याने आपल्याला आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजकांचे राज्य असे तयार केले आहे, त्या येशू ख्रिस्ताला वैभव व सामर्थ्य युगानुयुगे असोत, आमेन.
पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.
जो आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहे तो म्हणतो, “मी आदी व अंत आहे.”
देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते.
१०
प्रभूच्या दिवशी मी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आलो, तेव्हा मला कर्ण्याच्या नादासारखी जोरदार वाणी ऐकू आली.
११
ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”
१२
माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची, हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया
१३
आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला.
१४
त्याचे केस पांढऱ्या लोकरीसमान किंवा बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.
१५
त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती.
१६
त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता.
१७
मी त्याला पाहिले, तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मृतप्राय अवस्थेत पडलो. त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस! जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत आहे तो मी आहे!
१८
मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
१९
म्हणून जे तू पाहिले म्हणजेच जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.
२०
जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहतोस त्यांचे आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे:ते सात तारे हे सात ख्रिस्तमंडळ्यांचे दूत आहेत आणि सात समया ह्या सात ख्रिस्तमंडळ्या आहेत.”प्रकटीकरण १:1
प्रकटीकरण १:2
प्रकटीकरण १:3
प्रकटीकरण १:4
प्रकटीकरण १:5
प्रकटीकरण १:6
प्रकटीकरण १:7
प्रकटीकरण १:8
प्रकटीकरण १:9
प्रकटीकरण १:10
प्रकटीकरण १:11
प्रकटीकरण १:12
प्रकटीकरण १:13
प्रकटीकरण १:14
प्रकटीकरण १:15
प्रकटीकरण १:16
प्रकटीकरण १:17
प्रकटीकरण १:18
प्रकटीकरण १:19
प्रकटीकरण १:20


प्रकटीकरण 1 / प्रकटी 1
प्रकटीकरण 2 / प्रकटी 2
प्रकटीकरण 3 / प्रकटी 3
प्रकटीकरण 4 / प्रकटी 4
प्रकटीकरण 5 / प्रकटी 5
प्रकटीकरण 6 / प्रकटी 6
प्रकटीकरण 7 / प्रकटी 7
प्रकटीकरण 8 / प्रकटी 8
प्रकटीकरण 9 / प्रकटी 9
प्रकटीकरण 10 / प्रकटी 10
प्रकटीकरण 11 / प्रकटी 11
प्रकटीकरण 12 / प्रकटी 12
प्रकटीकरण 13 / प्रकटी 13
प्रकटीकरण 14 / प्रकटी 14
प्रकटीकरण 15 / प्रकटी 15
प्रकटीकरण 16 / प्रकटी 16
प्रकटीकरण 17 / प्रकटी 17
प्रकटीकरण 18 / प्रकटी 18
प्रकटीकरण 19 / प्रकटी 19
प्रकटीकरण 20 / प्रकटी 20
प्रकटीकरण 21 / प्रकटी 21
प्रकटीकरण 22 / प्रकटी 22