१ |
ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो: |
२ |
तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर सेवावृत्तीने करा. |
३ |
तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर सत्ता चालवणारे असे नव्हे, तर कळपापुढे आदर्श निर्माण करा. |
४ |
म्हणजे जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला वैभवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. |
५ |
तसेच तरुणांनो, वडीलजनांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो. |
६ |
देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हांला उच्च स्थान देईल. |
७ |
त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. |
८ |
सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे. |
९ |
त्याच्याविरुद्ध दृढ विश्वासाने असे उभे राहा, कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. |
१० |
आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल. |
११ |
त्याच्या सामर्थ्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन. |
१२ |
माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा. |
१३ |
बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत. |
१४ |
बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१ पीटर ५:1 |
१ पीटर ५:2 |
१ पीटर ५:3 |
१ पीटर ५:4 |
१ पीटर ५:5 |
१ पीटर ५:6 |
१ पीटर ५:7 |
१ पीटर ५:8 |
१ पीटर ५:9 |
१ पीटर ५:10 |
१ पीटर ५:11 |
१ पीटर ५:12 |
१ पीटर ५:13 |
१ पीटर ५:14 |
|
|
|
|
|
|
१ पीटर 1 / १पीटर 1 |
१ पीटर 2 / १पीटर 2 |
१ पीटर 3 / १पीटर 3 |
१ पीटर 4 / १पीटर 4 |
१ पीटर 5 / १पीटर 5 |