A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

१ पीटर ३स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.
***
तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे,
उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.
कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही पतीच्या अधीन राहून आपले अंतरिक सौंदर्य जोपासत असत.
ज्याप्रमाणे सारा अब्राहामची पत्नी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, त्याप्रमाणे तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही गोष्टीचे भय न बाळगल्यास, तुम्ही तिची मुले आहात.
पतींनो, तुम्हीही पत्नींबरोबर त्या अधिक नाजुक आहेत म्हणून सुज्ञतेने वागा, कारण तुमच्याबरोबर त्यादेखील देवाने दिलेली जीवनाची देणगी स्वीकारतील, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.
शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा.
वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.
१०
कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे.
११
त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.
१२
कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. मात्र वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते.
१३
तुम्ही चांगले करण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हांला कोण इजा करणार?
१४
परंतु नीतिमत्वामुळे तुम्हांला दुःख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. कुणाला भिऊ नका व चिंता करू नका.
१५
ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना आणि तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व सौजन्यपूर्वक द्या.
१६
तुमची सदसद्विवेकबुद्धी निर्मळ असू द्या म्हणजे तुमच्याविरुद्ध बोलणे चाललेले असता ख्रिस्तावरील तुमच्या एकनिष्ठेमुळे तुमच्या सद्वर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांना लज्जित व्हावे लागेल.
१७
चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे, अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.
१८
आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.
१९
त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली.
२०
हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता, त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले होते.
२१
त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मल धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराला दिलेले वचन असा आहे.
२२
येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो.१ पीटर ३:1
१ पीटर ३:2
१ पीटर ३:3
१ पीटर ३:4
१ पीटर ३:5
१ पीटर ३:6
१ पीटर ३:7
१ पीटर ३:8
१ पीटर ३:9
१ पीटर ३:10
१ पीटर ३:11
१ पीटर ३:12
१ पीटर ३:13
१ पीटर ३:14
१ पीटर ३:15
१ पीटर ३:16
१ पीटर ३:17
१ पीटर ३:18
१ पीटर ३:19
१ पीटर ३:20
१ पीटर ३:21
१ पीटर ३:22


१ पीटर 1 / १पीटर 1
१ पीटर 2 / १पीटर 2
१ पीटर 3 / १पीटर 3
१ पीटर 4 / १पीटर 4
१ पीटर 5 / १पीटर 5