१ |
ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या; |
२ |
कारण त्यांच्यासारखे आपल्यालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारले नाही. |
३ |
मात्र आपण श्रद्धावंत लोक परमेश्वराने वचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करीत आहोत. हे त्याच्या शब्दाप्रमाणेच घडत आहे: मी माझ्या क्रोधाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. जरी जगाच्या निर्मितीनंतर त्याचे कार्य पूर्ण झाले होते, तरीही तो हे म्हणाला. |
४ |
सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. |
५ |
आणि पुन्हा याचविषयी म्हटले आहे, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. |
६ |
ज्यांना पूर्वी शुभवर्तमान सांगण्यात आले होते ते अवज्ञेमुळे त्या विसाव्याच्या ठिकाणी आले नाहीत; इतरांना मात्र तेथे पोहोचता येण्यासारखे आहे. |
७ |
म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्याद्वारे म्हणतो, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका. |
८ |
जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाविषयी तो बोलला नसता. |
९ |
मात्र देवाच्या लोकांसाठी साबाथाचा विसावा राहिला आहे. |
१० |
कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात येतो, तो जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतो. |
११ |
म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अविश्वासाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्यापैकी कोणी अपयशी ठरू नये. |
१२ |
वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे; |
१३ |
त्याच्या दृष्टीला अदृश्य काहीच नाही, ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे, असे सृष्टीतील सर्व काही त्याच्या दृष्टीला उघड व प्रकट केलेले आहे आणि आपणा सर्वांना स्वतःविषयी त्याला हिशोब द्यावा लागणार आहे. |
१४ |
तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला देण्यात आलेला आहे, म्हणून आपण जी श्रद्धा स्वीकारली आहे ती दृढ धरून राहू या. |
१५ |
आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. |
१६ |
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इब्री ४:1 |
इब्री ४:2 |
इब्री ४:3 |
इब्री ४:4 |
इब्री ४:5 |
इब्री ४:6 |
इब्री ४:7 |
इब्री ४:8 |
इब्री ४:9 |
इब्री ४:10 |
इब्री ४:11 |
इब्री ४:12 |
इब्री ४:13 |
इब्री ४:14 |
इब्री ४:15 |
इब्री ४:16 |
|
|
|
|
|
|
इब्री 1 / इब्री 1 |
इब्री 2 / इब्री 2 |
इब्री 3 / इब्री 3 |
इब्री 4 / इब्री 4 |
इब्री 5 / इब्री 5 |
इब्री 6 / इब्री 6 |
इब्री 7 / इब्री 7 |
इब्री 8 / इब्री 8 |
इब्री 9 / इब्री 9 |
इब्री 10 / इब्री 10 |
इब्री 11 / इब्री 11 |
इब्री 12 / इब्री 12 |
इब्री 13 / इब्री 13 |