१ |
माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा. |
२ |
पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील. |
३ |
ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. |
४ |
जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते. |
५ |
धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. |
६ |
श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. |
७ |
जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो. |
८ |
माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. |
९ |
ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही. |
१० |
निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो. |
११ |
हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. |
१२ |
जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. |
१३ |
आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. |
१४ |
तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो. |
१५ |
सत्याचे वचन दक्षतेने सांगणारा व स्वतःच्या सेवाकार्याची लाज न बाळगणारा असा देवाच्या पसंतीला उतरलेला कामगार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर. |
१६ |
अमंगल व मूर्ख स्वरूपाच्या वादविवादापासून दूर राहा कारण असा वितंडवाद लोकांच्या अधार्मिकपणात भर घालतो. |
१७ |
अशी शिकवणूक कॅन्सरसारखी पसरते. हुमनाय व फिलेत ह्या दोघांनी अशी शिकवणूक दिलेली आहे. |
१८ |
ते सत्यापासून बहकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे, असे म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. |
१९ |
तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे: ‘आपले जे आहेत त्यांना प्रभू ओळखतो’ आणि ‘जो कोणी मी प्रभूचा आहे, असे म्हणतो त्याने अनीतीपासून दूर राहावे’. |
२० |
मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यांपैकी कित्येकांचा उपयोग विशेष प्रसंगी केला जातो व काहींचा सामान्य कार्यासाठी केला जातो. |
२१ |
जर कोणी दुष्टपणापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो सन्मानासाठी पवित्र केलेले, प्रभूला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तयार केलेले असे पात्र होईल. |
२२ |
तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध अंत:करणाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर यथोचित संबंध, विश्वास, प्रीती व शांती ह्यांचा पाठपुरावा कर. |
२३ |
मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. |
२४ |
प्रभूच्या सेवकाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, |
२५ |
विरोध करणाऱ्यांना नम्रतेने शिक्षण देणारा, असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी पश्चात्तापबुद्धी देईल |
२६ |
आणि त्यानंतर सैतानाच्या पाशातून सुटून ते देवाच्या इच्छेस वश होण्याकरता भानावर येतील.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ तीमथ्य २:1 |
२ तीमथ्य २:2 |
२ तीमथ्य २:3 |
२ तीमथ्य २:4 |
२ तीमथ्य २:5 |
२ तीमथ्य २:6 |
२ तीमथ्य २:7 |
२ तीमथ्य २:8 |
२ तीमथ्य २:9 |
२ तीमथ्य २:10 |
२ तीमथ्य २:11 |
२ तीमथ्य २:12 |
२ तीमथ्य २:13 |
२ तीमथ्य २:14 |
२ तीमथ्य २:15 |
२ तीमथ्य २:16 |
२ तीमथ्य २:17 |
२ तीमथ्य २:18 |
२ तीमथ्य २:19 |
२ तीमथ्य २:20 |
२ तीमथ्य २:21 |
२ तीमथ्य २:22 |
२ तीमथ्य २:23 |
२ तीमथ्य २:24 |
२ तीमथ्य २:25 |
२ तीमथ्य २:26 |
|
|
|
|
|
|
२ तीमथ्य 1 / २तीमथ्य 1 |
२ तीमथ्य 2 / २तीमथ्य 2 |
२ तीमथ्य 3 / २तीमथ्य 3 |
२ तीमथ्य 4 / २तीमथ्य 4 |