१ |
देवाच्या इच्छेने व ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाच्या वचनानुसार येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून, |
२ |
माझे प्रिय लेकरू तीमथ्य ह्याला: देवपिता व आपला प्रभू ख्रिस्त येशू तुला कृपा, दया व शांती देवो. |
३ |
मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. |
४ |
*** |
५ |
तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे. |
६ |
मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर; |
७ |
कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. |
८ |
म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. |
९ |
त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली. |
१० |
परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे. |
११ |
मला यहुदीतर लोकांसाठी प्रचारक, प्रेषित व शिक्षक म्हणून नेमले आहे. |
१२ |
ह्याच कारणाकरिता मी दुःखे देखील सोसत आहे, तरीही मला त्याची लाज वाटत नाही कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझ्या स्वाधीन केलेली ठेव न्यायाच्या दिवसासाठी सुरक्षित राखावयास शक्तिमान आहे, अशी माझी धारणा आहे. |
१३ |
तू स्वतः अनुकरण करावे म्हणून जी सत्यवचने मी तुला शिकविली आहेत, ती दृढ धरून ठेव. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या श्रद्धेत व प्रीतीत टिकून राहा. |
१४ |
तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ. |
१५ |
जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत. |
१६ |
अनेसिफरच्या कुटुंबावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार मला आधार दिला आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची लाज वाटली नाही, |
१७ |
तर तो रोम शहरात आल्यावर त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. |
१८ |
न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ तीमथ्य १:1 |
२ तीमथ्य १:2 |
२ तीमथ्य १:3 |
२ तीमथ्य १:4 |
२ तीमथ्य १:5 |
२ तीमथ्य १:6 |
२ तीमथ्य १:7 |
२ तीमथ्य १:8 |
२ तीमथ्य १:9 |
२ तीमथ्य १:10 |
२ तीमथ्य १:11 |
२ तीमथ्य १:12 |
२ तीमथ्य १:13 |
२ तीमथ्य १:14 |
२ तीमथ्य १:15 |
२ तीमथ्य १:16 |
२ तीमथ्य १:17 |
२ तीमथ्य १:18 |
|
|
|
|
|
|
२ तीमथ्य 1 / २तीमथ्य 1 |
२ तीमथ्य 2 / २तीमथ्य 2 |
२ तीमथ्य 3 / २तीमथ्य 3 |
२ तीमथ्य 4 / २तीमथ्य 4 |