१ |
जे दास म्हणून जोखडाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र आहेत, असे मानावे, ह्यासाठी की, देवाच्या नावाची व त्याच्या धर्मसत्याची कोणीही निंदा करणार नाही. |
२ |
ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर. |
३ |
जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही, |
४ |
तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे विकृत झालेला आहे. ह्यामुळे हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे सारे उत्पन्न होते. |
५ |
मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा. |
६ |
समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो. |
७ |
आपण जगात काही आणले नाही आणि निश्चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही! |
८ |
तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे. |
९ |
परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; |
१० |
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत. |
११ |
हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर. |
१२ |
श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस. |
१३ |
सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, |
१४ |
आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ. |
१५ |
जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही |
१६ |
आणि कोणी पाहू शकत नाही, तो प्रभू येशूचे प्रकट होणे यथाकाळी सिद्धीस नेईल, त्याला सन्मान व शाश्वत सामर्थ्य असो. आमेन. |
१७ |
प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी. |
१८ |
चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. |
१९ |
अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील. |
२० |
हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ; |
२१ |
कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१ तीमथ्य ६:1 |
१ तीमथ्य ६:2 |
१ तीमथ्य ६:3 |
१ तीमथ्य ६:4 |
१ तीमथ्य ६:5 |
१ तीमथ्य ६:6 |
१ तीमथ्य ६:7 |
१ तीमथ्य ६:8 |
१ तीमथ्य ६:9 |
१ तीमथ्य ६:10 |
१ तीमथ्य ६:11 |
१ तीमथ्य ६:12 |
१ तीमथ्य ६:13 |
१ तीमथ्य ६:14 |
१ तीमथ्य ६:15 |
१ तीमथ्य ६:16 |
१ तीमथ्य ६:17 |
१ तीमथ्य ६:18 |
१ तीमथ्य ६:19 |
१ तीमथ्य ६:20 |
१ तीमथ्य ६:21 |
|
|
|
|
|
|
१ तीमथ्य 1 / १तीमथ्य 1 |
१ तीमथ्य 2 / १तीमथ्य 2 |
१ तीमथ्य 3 / १तीमथ्य 3 |
१ तीमथ्य 4 / १तीमथ्य 4 |
१ तीमथ्य 5 / १तीमथ्य 5 |
१ तीमथ्य 6 / १तीमथ्य 6 |