Instagram
English
A A A A A
मराठी बायबल (BSI) 2018
१ तीमथ्य २
सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत.
राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे.
हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.
त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे.
कारण देव एक आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे.
त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे
आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते.
ख्रिस्तमंडळीमधल्या प्रत्येक उपासनेत पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,
१०
तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे.
११
स्त्रियांनी शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.
१२
स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे;
१३
कारण प्रथम आदामची निर्मिती झाली, नंतर हव्वेची
१४
आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.
१५
तथापि विश्वास, प्रीती, पवित्रता व मर्यादा ह्यांत टिकून राहिल्यास बालकांना जन्म देण्यामुळे तिचे तारण होईल.
१ तीमथ्य २:1
१ तीमथ्य २:2
१ तीमथ्य २:3
१ तीमथ्य २:4
१ तीमथ्य २:5
१ तीमथ्य २:6
१ तीमथ्य २:7
१ तीमथ्य २:8
१ तीमथ्य २:9
१ तीमथ्य २:10
१ तीमथ्य २:11
१ तीमथ्य २:12
१ तीमथ्य २:13
१ तीमथ्य २:14
१ तीमथ्य २:15
१ तीमथ्य 1 / १तीमथ्य 1
१ तीमथ्य 2 / १तीमथ्य 2
१ तीमथ्य 3 / १तीमथ्य 3
१ तीमथ्य 4 / १तीमथ्य 4
१ तीमथ्य 5 / १तीमथ्य 5
१ तीमथ्य 6 / १तीमथ्य 6