A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

२ थेस्सलनीकाकर ३बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा, ज्यामुळे तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या संदेशाचा त्वरेने प्रसार व्हावा व तो सन्मानाने स्वीकारला जावा.
दुष्ट व वाईट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वांमध्ये विश्वास आहे, असे नाही.
परंतु प्रभू विश्वसनीय आहे. तो तुम्हांला मजबूत करील व त्या दुष्टापासून तुमचे संरक्षण करील.
तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.
देवाच्या प्रीतीची व ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या सहनशीलतेची प्रभू तुम्हांला अधिक प्रगल्भ समज देवो.
बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.
आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही,
कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा, म्हणून असे केले.
१०
आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये.
११
तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत.
१२
अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.
१३
बंधूंनो, तुम्ही मात्र सत्कृत्ये करताना थकून जाऊ नका.
१४
ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका,
१५
मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या.
१६
शांतीचा उगम असलेला प्रभू स्वतः सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हां सर्वांबरोबर राहो.
१७
मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा, ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
१८
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.२ थेस्सलनीकाकर ३:1
२ थेस्सलनीकाकर ३:2
२ थेस्सलनीकाकर ३:3
२ थेस्सलनीकाकर ३:4
२ थेस्सलनीकाकर ३:5
२ थेस्सलनीकाकर ३:6
२ थेस्सलनीकाकर ३:7
२ थेस्सलनीकाकर ३:8
२ थेस्सलनीकाकर ३:9
२ थेस्सलनीकाकर ३:10
२ थेस्सलनीकाकर ३:11
२ थेस्सलनीकाकर ३:12
२ थेस्सलनीकाकर ३:13
२ थेस्सलनीकाकर ३:14
२ थेस्सलनीकाकर ३:15
२ थेस्सलनीकाकर ३:16
२ थेस्सलनीकाकर ३:17
२ थेस्सलनीकाकर ३:18


२ थेस्सलनीकाकर 1 / २थेस्स 1
२ थेस्सलनीकाकर 2 / २थेस्स 2
२ थेस्सलनीकाकर 3 / २थेस्स 3