१ |
बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी; |
२ |
कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत. |
३ |
देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे. |
४ |
तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे. |
५ |
देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये. |
६ |
कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते. |
७ |
देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे. |
८ |
म्हणून जो कोणी ह्या शिकवणीचा अव्हेर करतो, तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो. |
९ |
बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे. |
१० |
अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी. |
११ |
आम्ही तुम्हांला पूर्वी सांगितल्याप्रमाणे शांतीने जीवन जगणे, आपापल्या व्यवसायात मग्न असणे व स्वतः मेहनत करणे, हे तुमचे ध्येय असू द्या. |
१२ |
अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. |
१३ |
बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये. |
१४ |
येशू मरण पावला व पुन्हा उठला, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूवर श्रद्धा ठेवून जे निधन पावले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. |
१५ |
आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. |
१६ |
आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील. |
१७ |
नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. |
१८ |
म्हणून ह्या शब्दांनी एकमेकांना प्रोत्साहन द्या.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१ थेस्सलनीकाकर ४:1 |
१ थेस्सलनीकाकर ४:2 |
१ थेस्सलनीकाकर ४:3 |
१ थेस्सलनीकाकर ४:4 |
१ थेस्सलनीकाकर ४:5 |
१ थेस्सलनीकाकर ४:6 |
१ थेस्सलनीकाकर ४:7 |
१ थेस्सलनीकाकर ४:8 |
१ थेस्सलनीकाकर ४:9 |
१ थेस्सलनीकाकर ४:10 |
१ थेस्सलनीकाकर ४:11 |
१ थेस्सलनीकाकर ४:12 |
१ थेस्सलनीकाकर ४:13 |
१ थेस्सलनीकाकर ४:14 |
१ थेस्सलनीकाकर ४:15 |
१ थेस्सलनीकाकर ४:16 |
१ थेस्सलनीकाकर ४:17 |
१ थेस्सलनीकाकर ४:18 |
|
|
|
|
|
|
१ थेस्सलनीकाकर 1 / १थेस्स 1 |
१ थेस्सलनीकाकर 2 / १थेस्स 2 |
१ थेस्सलनीकाकर 3 / १थेस्स 3 |
१ थेस्सलनीकाकर 4 / १थेस्स 4 |
१ थेस्सलनीकाकर 5 / १थेस्स 5 |