A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

२ करिंथकर १देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून:करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस शुभेच्छा.
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून तुम्हांला कृपा व शांती मिळो.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, दयाघन पिता व सर्वप्रकारे सांत्वनकर्ता देव, ह्याचे आपण आभार मानू या.
तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो. आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही संकटग्रस्तांचे सांत्वन करण्यास समर्थ आहोत.
कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते.
जर आमच्यावर संकट येते, ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि जर आम्हांला सांत्वन मिळते, तर ते तुमचे सांत्वन करता यावे म्हणून मिळते, म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सहन करतो, तीच दुःखे धीराने सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळावे.
तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात.
बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. कारण तिथे आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. इतके की, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली.
खरे तर आम्ही मरणारच, असे आमचे मन आम्हांला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे घडले.
१०
त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवेल, अशी त्याच्यामध्ये आम्हांला आशा आहे.
११
तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील.
१२
खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.
१३
जे तुम्ही वाचू शकता व समजू शकता त्यावाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही. परंतु जरी तुम्ही आता आमची शिकवण अंशतः समजत असला, तरी आम्हांला आशा आहे की, तुम्हांला पूर्ण समज येईल. ज्यामुळे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी आम्हांला जसा तुमचा अभिमान वाटेल, तसा तुम्हांलाही आमचा अभिमान वाटेल.
१४
***
१५
अशी खातरी बाळगून तुम्हांला दुप्पट कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे,
१६
तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे आणि तुम्ही मला यहुदियाकडे जाण्यासाठी मदत करावी, असा माझा बेत होता.
१७
तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय?
१८
देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय-नाही असे द्विधावृत्तीचे नव्हते;
१९
कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची जी घोषणा आमच्याकडून म्हणजे सिल्वान, तिमथ्य व माझ्याकडून, तुमच्यामध्ये झाली ती होय-नाही अशी नव्हती, तर त्याच्यामध्ये होय अशीच ठाम स्वरूपाची होती.
२०
देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो,
२१
परंतु परमेश्वर आम्हांला तुमच्याबरोबर ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व त्याने आमच्यावर अभिषेक केला आहे.
२२
त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे.
२३
माझे अंतःकरण जाणणाऱ्या देवाला साक्षी ठेवून मी सांगतो की, तुम्हांला त्रासापासून वाचविण्याकरिता मी करिंथ येथे जाण्याचे टाळले.
२४
कारण तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ उभे आहात. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नव्हे, तर आम्ही तुमच्या आनंदाकरिता तुम्हांला साहाय्य करीत आहोत.२ करिंथकर १:1

२ करिंथकर १:2

२ करिंथकर १:3

२ करिंथकर १:4

२ करिंथकर १:5

२ करिंथकर १:6

२ करिंथकर १:7

२ करिंथकर १:8

२ करिंथकर १:9

२ करिंथकर १:10

२ करिंथकर १:11

२ करिंथकर १:12

२ करिंथकर १:13

२ करिंथकर १:14

२ करिंथकर १:15

२ करिंथकर १:16

२ करिंथकर १:17

२ करिंथकर १:18

२ करिंथकर १:19

२ करिंथकर १:20

२ करिंथकर १:21

२ करिंथकर १:22

२ करिंथकर १:23

२ करिंथकर १:24२ करिंथकर 1 / २करिंथ 1

२ करिंथकर 2 / २करिंथ 2

२ करिंथकर 3 / २करिंथ 3

२ करिंथकर 4 / २करिंथ 4

२ करिंथकर 5 / २करिंथ 5

२ करिंथकर 6 / २करिंथ 6

२ करिंथकर 7 / २करिंथ 7

२ करिंथकर 8 / २करिंथ 8

२ करिंथकर 9 / २करिंथ 9

२ करिंथकर 10 / २करिंथ 10

२ करिंथकर 11 / २करिंथ 11

२ करिंथकर 12 / २करिंथ 12

२ करिंथकर 13 / २करिंथ 13