१ |
आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. |
२ |
आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. |
३ |
ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. |
४ |
जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी. |
५ |
धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो. |
६ |
त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा. |
७ |
जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा; |
८ |
कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला. |
९ |
तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. |
१० |
यहुदीतरांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा! धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे: |
११ |
सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे: |
१२ |
आणखी यशया पुन्हा म्हणतो, ‘इशायाचा वंशज उदयास येईल, तो यहुदीतरांवर अधिकार चालविण्याकरिता येईल, यहुदीतर त्याची आशा बाळगतील.’ |
१३ |
आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. |
१४ |
बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खातरी झाली आहे. |
१५ |
परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे. |
१६ |
ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे. |
१७ |
म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो. |
१८ |
यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे. |
१९ |
*** |
२० |
दुसऱ्यांनी घातलेल्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नव्हे, तर |
२१ |
त्याच्याविषयी ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही ते समजतील, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती. |
२२ |
ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला. |
२३ |
परंतु आता ह्या प्रांतात माझे कार्य संपले असल्यामुळे आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा असल्यामुळे, |
२४ |
मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन. तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने मन काहीसे तृप्त झाल्यावर तुम्ही मला तिथे जायला साहाय्य कराल, अशी मी आशा धरतो. |
२५ |
सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे; |
२६ |
कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे. |
२७ |
हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. परंतु वस्तुतः त्यांना मदत करणे त्यांचे कर्तव्य होते; कारण जर यहुदीतर त्यांच्या आध्यात्मिक आशीर्वादात सहभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. |
२८ |
हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन. |
२९ |
जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे. |
३० |
बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की, माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर कळकळीने प्रार्थना करा. |
३१ |
ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे. |
३२ |
म्हणजे मी परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्या सहवासात ताजातवाना होईन. |
३३ |
शांतिदाता परमेश्वर तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रोमन्स १५:1 |
रोमन्स १५:2 |
रोमन्स १५:3 |
रोमन्स १५:4 |
रोमन्स १५:5 |
रोमन्स १५:6 |
रोमन्स १५:7 |
रोमन्स १५:8 |
रोमन्स १५:9 |
रोमन्स १५:10 |
रोमन्स १५:11 |
रोमन्स १५:12 |
रोमन्स १५:13 |
रोमन्स १५:14 |
रोमन्स १५:15 |
रोमन्स १५:16 |
रोमन्स १५:17 |
रोमन्स १५:18 |
रोमन्स १५:19 |
रोमन्स १५:20 |
रोमन्स १५:21 |
रोमन्स १५:22 |
रोमन्स १५:23 |
रोमन्स १५:24 |
रोमन्स १५:25 |
रोमन्स १५:26 |
रोमन्स १५:27 |
रोमन्स १५:28 |
रोमन्स १५:29 |
रोमन्स १५:30 |
रोमन्स १५:31 |
रोमन्स १५:32 |
रोमन्स १५:33 |
|
|
|
|
|
|
रोमन्स 1 / रोमन्स 1 |
रोमन्स 2 / रोमन्स 2 |
रोमन्स 3 / रोमन्स 3 |
रोमन्स 4 / रोमन्स 4 |
रोमन्स 5 / रोमन्स 5 |
रोमन्स 6 / रोमन्स 6 |
रोमन्स 7 / रोमन्स 7 |
रोमन्स 8 / रोमन्स 8 |
रोमन्स 9 / रोमन्स 9 |
रोमन्स 10 / रोमन्स 10 |
रोमन्स 11 / रोमन्स 11 |
रोमन्स 12 / रोमन्स 12 |
रोमन्स 13 / रोमन्स 13 |
रोमन्स 14 / रोमन्स 14 |
रोमन्स 15 / रोमन्स 15 |
रोमन्स 16 / रोमन्स 16 |