१ |
नंतर गलबला शांत झाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. |
२ |
त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो अखया प्रांतात गेला. |
३ |
तेथे तीन महिने राहिल्यावर तो तारवातून सूरिया देशात जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला आहे, हे कळता त्याने मासेदोनियातूनच परत जाण्याचा बेत केला. |
४ |
बिरुया येथला पुर्राचा मुलगा सोपत्र तसेच थेस्सलनीकर अरिस्तार्ख, सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य, आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. |
५ |
ते पुढे जाऊन त्रोवस येथे आमची वाट पाहत राहिले. |
६ |
बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही एक आठवडा राहिलो. |
७ |
आम्ही शनिवारी सायंकाळी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौलाने त्यांच्यापुढे भाषण केले. त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले, कारण तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. |
८ |
ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो, तेथे बरेच दिवे होते. |
९ |
युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने त्याचे डोळे जड होऊ लागले. पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे युतुख झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. |
१० |
तेव्हा पौल खाली उतरला आणि स्वतःला त्याच्यावर झोकून देऊन त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका, हा अजून जिवंत आहे.” |
११ |
त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर बोलत राहिला व नंतर तो तेथून निघून गेला. |
१२ |
त्या तरुणाला जिवंत घरी नेता आल्यामुळे त्यांना फार बरे वाटले. |
१३ |
आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्सा या ठिकाणी गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः भूमार्गे येणार होता. |
१४ |
तो अस्सा येथे आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेन येथे आलो. |
१५ |
तेथून तारवातून दुसऱ्या दिवशी आम्ही खिया येथे आलो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सामा बंदर गाठले, मग त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेत येथे आलो. |
१६ |
आपणाला आशिया प्रांतांमध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस येथे न थांबण्याचा पौलाने निश्चय केला होता कारण कसेही करून पेन्टेकॉस्टच्या सणात यरुशलेममध्ये असावे यासाठी तो घाई करत होता. |
१७ |
त्याने मिलेतहून इफिसला निरोप पाठवून ख्रिस्तमंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले. |
१८ |
ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून माझा जीवनक्रम कसा होता, |
१९ |
म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. |
२० |
जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. |
२१ |
पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो. |
२२ |
आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही. |
२३ |
केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. |
२४ |
परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे. |
२५ |
मी तुमच्यामध्ये देवराज्याची घोषणा करत फिरलो, येथून पुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. |
२६ |
म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही |
२७ |
कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही. |
२८ |
म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. |
२९ |
मी गेल्यावर कळपाला दयामाया न दाखवणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. |
३० |
तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. |
३१ |
मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा. |
३२ |
आता मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो, तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन द्यावयास समर्थ आहे. |
३३ |
मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. |
३४ |
माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. |
३५ |
सर्व गोष्टींत मी कित्ता घालून दिला आहे. तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना साहाय्य करावे आणि ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे’, असे जे शद्ब प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” |
३६ |
असे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. |
३७ |
ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. |
३८ |
‘ह्यापुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही’, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. त्यानंतर त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचविले.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कायदे २०:1 |
कायदे २०:2 |
कायदे २०:3 |
कायदे २०:4 |
कायदे २०:5 |
कायदे २०:6 |
कायदे २०:7 |
कायदे २०:8 |
कायदे २०:9 |
कायदे २०:10 |
कायदे २०:11 |
कायदे २०:12 |
कायदे २०:13 |
कायदे २०:14 |
कायदे २०:15 |
कायदे २०:16 |
कायदे २०:17 |
कायदे २०:18 |
कायदे २०:19 |
कायदे २०:20 |
कायदे २०:21 |
कायदे २०:22 |
कायदे २०:23 |
कायदे २०:24 |
कायदे २०:25 |
कायदे २०:26 |
कायदे २०:27 |
कायदे २०:28 |
कायदे २०:29 |
कायदे २०:30 |
कायदे २०:31 |
कायदे २०:32 |
कायदे २०:33 |
कायदे २०:34 |
कायदे २०:35 |
कायदे २०:36 |
कायदे २०:37 |
कायदे २०:38 |
|
|
|
|
|
|
कायदे 1 / कायदे 1 |
कायदे 2 / कायदे 2 |
कायदे 3 / कायदे 3 |
कायदे 4 / कायदे 4 |
कायदे 5 / कायदे 5 |
कायदे 6 / कायदे 6 |
कायदे 7 / कायदे 7 |
कायदे 8 / कायदे 8 |
कायदे 9 / कायदे 9 |
कायदे 10 / कायदे 10 |
कायदे 11 / कायदे 11 |
कायदे 12 / कायदे 12 |
कायदे 13 / कायदे 13 |
कायदे 14 / कायदे 14 |
कायदे 15 / कायदे 15 |
कायदे 16 / कायदे 16 |
कायदे 17 / कायदे 17 |
कायदे 18 / कायदे 18 |
कायदे 19 / कायदे 19 |
कायदे 20 / कायदे 20 |
कायदे 21 / कायदे 21 |
कायदे 22 / कायदे 22 |
कायदे 23 / कायदे 23 |
कायदे 24 / कायदे 24 |
कायदे 25 / कायदे 25 |
कायदे 26 / कायदे 26 |
कायदे 27 / कायदे 27 |
कायदे 28 / कायदे 28 |