१ |
प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला. |
२ |
*** |
३ |
मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले. |
४ |
ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा. |
५ |
योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.” |
६ |
प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?” |
७ |
तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही. |
८ |
परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.” |
९ |
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. |
१० |
तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले |
११ |
आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.” |
१२ |
यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले |
१३ |
आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले. |
१४ |
हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र जमत असत. |
१५ |
काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला, |
१६ |
“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले, ते पूर्ण होणे आवश्यक होते. |
१७ |
जो आपल्यामध्ये गणला जात होता आणि ज्याला आपल्या सेवाकार्यात सहभागी करण्यात आले होते. |
१८ |
त्याने त्याच्या दुष्टाईच्या मोबदल्यातून जे शेत विकत घेतले, त्यात तो पालथा पडल्याने त्याचे पोट मधोमध फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. |
१९ |
यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्वांना हे कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. |
२० |
स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे: त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचे अधिकारपद दुसरा घेवो. |
२१ |
योहानच्या बाप्तिस्म्यानंतर ज्या दिवशी येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, तोपर्यंत |
२२ |
म्हणजे येशू आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या कालावधीत जी माणसे आपल्याबरोबर होती त्यांच्यांतून एकाने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हावे.” |
२३ |
तेव्हा बर्सबा म्हटलेला योसेफ ऊर्फ युस्त व मत्थिया ह्या दोघांची नावे सुचविण्यात आली. |
२४ |
मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “सर्वांची हृदये जाणणाऱ्या हे प्रभो, |
२५ |
हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.” |
२६ |
मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कायदे १:1 |
कायदे १:2 |
कायदे १:3 |
कायदे १:4 |
कायदे १:5 |
कायदे १:6 |
कायदे १:7 |
कायदे १:8 |
कायदे १:9 |
कायदे १:10 |
कायदे १:11 |
कायदे १:12 |
कायदे १:13 |
कायदे १:14 |
कायदे १:15 |
कायदे १:16 |
कायदे १:17 |
कायदे १:18 |
कायदे १:19 |
कायदे १:20 |
कायदे १:21 |
कायदे १:22 |
कायदे १:23 |
कायदे १:24 |
कायदे १:25 |
कायदे १:26 |
|
|
|
|
|
|
कायदे 1 / कायदे 1 |
कायदे 2 / कायदे 2 |
कायदे 3 / कायदे 3 |
कायदे 4 / कायदे 4 |
कायदे 5 / कायदे 5 |
कायदे 6 / कायदे 6 |
कायदे 7 / कायदे 7 |
कायदे 8 / कायदे 8 |
कायदे 9 / कायदे 9 |
कायदे 10 / कायदे 10 |
कायदे 11 / कायदे 11 |
कायदे 12 / कायदे 12 |
कायदे 13 / कायदे 13 |
कायदे 14 / कायदे 14 |
कायदे 15 / कायदे 15 |
कायदे 16 / कायदे 16 |
कायदे 17 / कायदे 17 |
कायदे 18 / कायदे 18 |
कायदे 19 / कायदे 19 |
कायदे 20 / कायदे 20 |
कायदे 21 / कायदे 21 |
कायदे 22 / कायदे 22 |
कायदे 23 / कायदे 23 |
कायदे 24 / कायदे 24 |
कायदे 25 / कायदे 25 |
कायदे 26 / कायदे 26 |
कायदे 27 / कायदे 27 |
कायदे 28 / कायदे 28 |