१ |
सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले. |
२ |
क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली. |
३ |
सर्व लोक आपापल्या गावी नावनोंदणी करण्यासाठी गेले. |
४ |
योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला, |
५ |
नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती. |
६ |
ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली. |
७ |
तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. |
८ |
त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. |
९ |
त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली. |
१० |
परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: |
११ |
तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! |
१२ |
तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.” |
१३ |
इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, |
१४ |
“स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.” |
१५ |
देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.” |
१६ |
म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले. |
१७ |
त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले. |
१८ |
मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले. |
१९ |
परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली. |
२० |
ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व घटना प्रत्यक्ष घडलेल्या ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. |
२१ |
आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने दिले होते. |
२२ |
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले. |
२३ |
म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणून गणला जावा’, असे जे नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे, |
२४ |
तसेच प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कबुतरांची जोडी किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञदेखील त्यांनी अर्पण करावा. |
२५ |
त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता. |
२६ |
‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. |
२७ |
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, |
२८ |
तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले, |
२९ |
“हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे; |
३० |
कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुझे तारण पाहिले आहे. |
३१ |
ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे. |
३२ |
ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा प्रकट व्हावी म्हणून प्रकाश व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.” |
३३ |
येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. |
३४ |
शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलमध्ये अनेकांचा नाश व उद्धार व्हावा म्हणून व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह व्हावे म्हणून परमेश्वराने ह्याची नियुक्ती केली आहे. |
३५ |
त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.” |
३६ |
देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती. |
३७ |
आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे. |
३८ |
तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली. |
३९ |
प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालीलमधील आपले गाव नासरेथ येथे परत गेले. |
४० |
ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती. |
४१ |
त्याचे आईबाप दर वर्षी ओलांडण सणासाठी यरुशलेमला जात असत. |
४२ |
येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले. |
४३ |
सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते. |
४४ |
तो वाटेवरच्या सोबत्यांत असेल, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे लोक ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध घेतला. |
४५ |
तो त्यांना सापडला नाही, तेव्हा ते त्याचा शोध घेत घेत यरुशलेमला परत गेले. |
४६ |
तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना सापडला. |
४७ |
त्याची बुद्धिमत्ता व उत्तरे ह्यांवरून त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व थक्क झाले. |
४८ |
त्याला तेथे पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझे वडील व मी चिंताक्रांत होऊन तुझा शोध घेत परत आलो.” |
४९ |
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध घेत राहिलात हे कसे? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” |
५० |
परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही. |
५१ |
नंतर तो त्यांच्याबरोबर नासरेथ येथे गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवल्या. |
५२ |
येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लूक २:1 |
लूक २:2 |
लूक २:3 |
लूक २:4 |
लूक २:5 |
लूक २:6 |
लूक २:7 |
लूक २:8 |
लूक २:9 |
लूक २:10 |
लूक २:11 |
लूक २:12 |
लूक २:13 |
लूक २:14 |
लूक २:15 |
लूक २:16 |
लूक २:17 |
लूक २:18 |
लूक २:19 |
लूक २:20 |
लूक २:21 |
लूक २:22 |
लूक २:23 |
लूक २:24 |
लूक २:25 |
लूक २:26 |
लूक २:27 |
लूक २:28 |
लूक २:29 |
लूक २:30 |
लूक २:31 |
लूक २:32 |
लूक २:33 |
लूक २:34 |
लूक २:35 |
लूक २:36 |
लूक २:37 |
लूक २:38 |
लूक २:39 |
लूक २:40 |
लूक २:41 |
लूक २:42 |
लूक २:43 |
लूक २:44 |
लूक २:45 |
लूक २:46 |
लूक २:47 |
लूक २:48 |
लूक २:49 |
लूक २:50 |
लूक २:51 |
लूक २:52 |
|
|
|
|
|
|
लूक 1 / लूक 1 |
लूक 2 / लूक 2 |
लूक 3 / लूक 3 |
लूक 4 / लूक 4 |
लूक 5 / लूक 5 |
लूक 6 / लूक 6 |
लूक 7 / लूक 7 |
लूक 8 / लूक 8 |
लूक 9 / लूक 9 |
लूक 10 / लूक 10 |
लूक 11 / लूक 11 |
लूक 12 / लूक 12 |
लूक 13 / लूक 13 |
लूक 14 / लूक 14 |
लूक 15 / लूक 15 |
लूक 16 / लूक 16 |
लूक 17 / लूक 17 |
लूक 18 / लूक 18 |
लूक 19 / लूक 19 |
लूक 20 / लूक 20 |
लूक 21 / लूक 21 |
लूक 22 / लूक 22 |
लूक 23 / लूक 23 |
लूक 24 / लूक 24 |