१ |
येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले. |
२ |
तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला. |
३ |
तो दफनभूमीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते |
४ |
कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड व बेड्या तोडल्या होत्या. त्याला काबूत ठेवणे कुणालाही शक्य नव्हते. |
५ |
तो नेहमी रात्रंदिवस दफनभूमीत व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी स्वतःचे अंग ठेचून घेत असे. |
६ |
येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला |
७ |
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.” |
८ |
तो असे म्हणाला कारण येशू म्हणत होता, “अरे भुता, ह्या माणसातून नीघ.” |
९ |
येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. |
१० |
आम्हांला ह्या प्रदेशातून घालवू नकोस”,अशी तो येशूला कळकळीने विनंती करीत होता. |
११ |
तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. |
१२ |
भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.” |
१३ |
त्याने त्यांना परवानगी दिली. ती भुते निघून डुकरांत शिरली. सुमारे दोन हजार डुकरांचा तो संपूर्ण कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मेला. |
१४ |
डुकरे राखणारे पळाले व त्यांनी नगरात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, हे पाहायला लोक आले. |
१५ |
ते येशूजवळ आल्यावर ज्यात सैन्य होते तो भूतग्रस्त बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांना भीती वाटली. |
१६ |
घडलेला प्रकार ज्यांनी पाहिला होता, त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकिकत त्यांना सांगितली. |
१७ |
तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले. |
१८ |
येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.” |
१९ |
परंतु त्याने नकार देऊन त्याला म्हटले, “तू आपल्या घरी आप्तजनांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढे महान कार्य केले व तुझ्यावर कशी दया केली, हे त्यांना सांग.” |
२० |
तो निघाला आणि येशूने जे महान कार्य त्याच्यासाठी केले होते, ते दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. |
२१ |
येशू मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे परत गेल्यावर त्याच्याभोवती सरोवराजवळ लोकांचा विशाल समुदाय जमला. |
२२ |
तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. |
२३ |
त्याने येशूला कळकळीने विनंती केली, “माझी लहान मुलगी अत्यंत आजारी आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” |
२४ |
तो त्याच्याबरोबर निघाला. पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती चोहीकडून गर्दी करत होते. |
२५ |
बारा वर्षे रक्तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती. |
२६ |
तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता. |
२७ |
तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला, |
२८ |
कारण ती म्हणत असे, “केवळ ह्याच्या वस्त्रांना मी स्पर्श केला तरी मी बरी होईन.” |
२९ |
तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली. |
३० |
स्वतःमधून शक्ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?” |
३१ |
त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’” |
३२ |
जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. |
३३ |
ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीतभीत व थरथर कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला. |
३४ |
तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” |
३५ |
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?” |
३६ |
परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.” |
३७ |
नंतर त्याने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही स्वतःबरोबर येऊ दिले नाही. |
३८ |
ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला. |
३९ |
तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” |
४० |
ते त्याला हसू लागले, परंतु त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मुलीचे आईवडील व स्वतःबरोबरचे तीन शिष्य ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो गेला. |
४१ |
मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम”, ह्याचा अर्थ “लहान मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” |
४२ |
लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती बारा वर्षांची होती. घडलेला हा प्रकार पाहून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. |
४३ |
मात्र हे कोणाला कळता कामा नये, असे त्याने त्यांना निक्षून सांगितले व तिला खायला द्या, असे म्हटले.
|
Marathi Bible (BSI) 2018 |
The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मार्क ५:1 |
मार्क ५:2 |
मार्क ५:3 |
मार्क ५:4 |
मार्क ५:5 |
मार्क ५:6 |
मार्क ५:7 |
मार्क ५:8 |
मार्क ५:9 |
मार्क ५:10 |
मार्क ५:11 |
मार्क ५:12 |
मार्क ५:13 |
मार्क ५:14 |
मार्क ५:15 |
मार्क ५:16 |
मार्क ५:17 |
मार्क ५:18 |
मार्क ५:19 |
मार्क ५:20 |
मार्क ५:21 |
मार्क ५:22 |
मार्क ५:23 |
मार्क ५:24 |
मार्क ५:25 |
मार्क ५:26 |
मार्क ५:27 |
मार्क ५:28 |
मार्क ५:29 |
मार्क ५:30 |
मार्क ५:31 |
मार्क ५:32 |
मार्क ५:33 |
मार्क ५:34 |
मार्क ५:35 |
मार्क ५:36 |
मार्क ५:37 |
मार्क ५:38 |
मार्क ५:39 |
मार्क ५:40 |
मार्क ५:41 |
मार्क ५:42 |
मार्क ५:43 |
|
|
|
|
|
|
मार्क 1 / मार्क 1 |
मार्क 2 / मार्क 2 |
मार्क 3 / मार्क 3 |
मार्क 4 / मार्क 4 |
मार्क 5 / मार्क 5 |
मार्क 6 / मार्क 6 |
मार्क 7 / मार्क 7 |
मार्क 8 / मार्क 8 |
मार्क 9 / मार्क 9 |
मार्क 10 / मार्क 10 |
मार्क 11 / मार्क 11 |
मार्क 12 / मार्क 12 |
मार्क 13 / मार्क 13 |
मार्क 14 / मार्क 14 |
मार्क 15 / मार्क 15 |
मार्क 16 / मार्क 16 |