१ |
अबीमलेखानंतर इस्राएलाचे संरक्षण करायला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे. |
२ |
त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. |
३ |
त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. |
४ |
त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात. |
५ |
याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ |
६ |
मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात, |
७ |
म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले. |
८ |
यार्देनेच्या पलीकडे अमोर्यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला. |
९ |
अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते. |
१० |
मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” |
११ |
तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले; |
१२ |
तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का? |
१३ |
तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. |
१४ |
जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.” |
१५ |
तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.” |
१६ |
मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला. |
१७ |
मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला, तसेच इस्राएल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला. |
१८ |
गिलादाचे सरदार एकमेकांना विचारू लागले, “अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
न्यायाधीश १०:1 |
न्यायाधीश १०:2 |
न्यायाधीश १०:3 |
न्यायाधीश १०:4 |
न्यायाधीश १०:5 |
न्यायाधीश १०:6 |
न्यायाधीश १०:7 |
न्यायाधीश १०:8 |
न्यायाधीश १०:9 |
न्यायाधीश १०:10 |
न्यायाधीश १०:11 |
न्यायाधीश १०:12 |
न्यायाधीश १०:13 |
न्यायाधीश १०:14 |
न्यायाधीश १०:15 |
न्यायाधीश १०:16 |
न्यायाधीश १०:17 |
न्यायाधीश १०:18 |
|
|
|
|
|
|
न्यायाधीश 1 / न्यायाध 1 |
न्यायाधीश 2 / न्यायाध 2 |
न्यायाधीश 3 / न्यायाध 3 |
न्यायाधीश 4 / न्यायाध 4 |
न्यायाधीश 5 / न्यायाध 5 |
न्यायाधीश 6 / न्यायाध 6 |
न्यायाधीश 7 / न्यायाध 7 |
न्यायाधीश 8 / न्यायाध 8 |
न्यायाधीश 9 / न्यायाध 9 |
न्यायाधीश 10 / न्यायाध 10 |
न्यायाधीश 11 / न्यायाध 11 |
न्यायाधीश 12 / न्यायाध 12 |
न्यायाधीश 13 / न्यायाध 13 |
न्यायाधीश 14 / न्यायाध 14 |
न्यायाधीश 15 / न्यायाध 15 |
न्यायाधीश 16 / न्यायाध 16 |
न्यायाधीश 17 / न्यायाध 17 |
न्यायाधीश 18 / न्यायाध 18 |
न्यायाधीश 19 / न्यायाध 19 |
न्यायाधीश 20 / न्यायाध 20 |
न्यायाधीश 21 / न्यायाध 21 |