Instagram
English
A A A A A
मराठी बायबल 2015
प्रकटीकरण २०
नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता.
त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;
आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे
नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान.
पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसर्‍या मरणाची सत्ता नाही, तर ते ‘देवाचे’ व ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल;
आणि तो ‘पृथ्वीच्या चार कोपर्‍यांतील गोग’ व ‘मागोग’ ह्या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरून पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढले; ‘तेव्हा [देवापासून] स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘खाऊन टाकले.’
१०
त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.
११
‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’
१२
मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.
१३
तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला.
१४
तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.
१५
ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.
प्रकटीकरण २०:1
प्रकटीकरण २०:2
प्रकटीकरण २०:3
प्रकटीकरण २०:4
प्रकटीकरण २०:5
प्रकटीकरण २०:6
प्रकटीकरण २०:7
प्रकटीकरण २०:8
प्रकटीकरण २०:9
प्रकटीकरण २०:10
प्रकटीकरण २०:11
प्रकटीकरण २०:12
प्रकटीकरण २०:13
प्रकटीकरण २०:14
प्रकटीकरण २०:15
प्रकटीकरण 1 / प्रकटी 1
प्रकटीकरण 2 / प्रकटी 2
प्रकटीकरण 3 / प्रकटी 3
प्रकटीकरण 4 / प्रकटी 4
प्रकटीकरण 5 / प्रकटी 5
प्रकटीकरण 6 / प्रकटी 6
प्रकटीकरण 7 / प्रकटी 7
प्रकटीकरण 8 / प्रकटी 8
प्रकटीकरण 9 / प्रकटी 9
प्रकटीकरण 10 / प्रकटी 10
प्रकटीकरण 11 / प्रकटी 11
प्रकटीकरण 12 / प्रकटी 12
प्रकटीकरण 13 / प्रकटी 13
प्रकटीकरण 14 / प्रकटी 14
प्रकटीकरण 15 / प्रकटी 15
प्रकटीकरण 16 / प्रकटी 16
प्रकटीकरण 17 / प्रकटी 17
प्रकटीकरण 18 / प्रकटी 18
प्रकटीकरण 19 / प्रकटी 19
प्रकटीकरण 20 / प्रकटी 20
प्रकटीकरण 21 / प्रकटी 21
प्रकटीकरण 22 / प्रकटी 22