१ |
यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. |
२ |
तीन दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले. |
३ |
त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हालवून त्याच्या पाठोपाठ जा; |
४ |
पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हांला जायचे आहे ती तुम्हांला समजेल; कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाहीत.” |
५ |
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.” |
६ |
नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. |
७ |
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. |
८ |
कराराचा कोश वाहणार्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’ |
९ |
मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका.” |
१० |
यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल: |
११ |
अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे. |
१२ |
तर आता इस्राएल वंशांतून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एकेक. |
१३ |
अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.” |
१४ |
लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले; |
१५ |
कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते); |
१६ |
तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. |
१७ |
परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यहोशवा ३:1 |
यहोशवा ३:2 |
यहोशवा ३:3 |
यहोशवा ३:4 |
यहोशवा ३:5 |
यहोशवा ३:6 |
यहोशवा ३:7 |
यहोशवा ३:8 |
यहोशवा ३:9 |
यहोशवा ३:10 |
यहोशवा ३:11 |
यहोशवा ३:12 |
यहोशवा ३:13 |
यहोशवा ३:14 |
यहोशवा ३:15 |
यहोशवा ३:16 |
यहोशवा ३:17 |
|
|
|
|
|
|
यहोशवा 1 / यहोशवा 1 |
यहोशवा 2 / यहोशवा 2 |
यहोशवा 3 / यहोशवा 3 |
यहोशवा 4 / यहोशवा 4 |
यहोशवा 5 / यहोशवा 5 |
यहोशवा 6 / यहोशवा 6 |
यहोशवा 7 / यहोशवा 7 |
यहोशवा 8 / यहोशवा 8 |
यहोशवा 9 / यहोशवा 9 |
यहोशवा 10 / यहोशवा 10 |
यहोशवा 11 / यहोशवा 11 |
यहोशवा 12 / यहोशवा 12 |
यहोशवा 13 / यहोशवा 13 |
यहोशवा 14 / यहोशवा 14 |
यहोशवा 15 / यहोशवा 15 |
यहोशवा 16 / यहोशवा 16 |
यहोशवा 17 / यहोशवा 17 |
यहोशवा 18 / यहोशवा 18 |
यहोशवा 19 / यहोशवा 19 |
यहोशवा 20 / यहोशवा 20 |
यहोशवा 21 / यहोशवा 21 |
यहोशवा 22 / यहोशवा 22 |
यहोशवा 23 / यहोशवा 23 |
यहोशवा 24 / यहोशवा 24 |