१ |
योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा: मनश्शेचा ज्येष्ठ पुत्र माखीर हा गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले. |
२ |
मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे वाटे मिळाले. हे वाटे अबीयेजेर, हेलेक, अस्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे आपापल्या कुळांप्रमाणे योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशांतले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे वाटे ठरले. |
३ |
पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याला मुलगे नव्हते, मुलीच होत्या; त्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा ही होती. |
४ |
एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि सरदार मंडळी ह्यांच्यापुढे ह्या मुली येऊन म्हणाल्या, “आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन देण्याची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती.” तेव्हा यहोशवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन दिले. |
५ |
ह्या प्रकारे यार्देनेपलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा हिस्से मिळाले; |
६ |
कारण मनश्शेच्या वंशातल्या मुलींना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन मिळाले आणि मनश्शेच्या इतर मुलांना गिलाद मिळाला. |
७ |
मनश्शेची सीमा आशेराहून शखेमाच्या पूर्वेकडील मिखमथाथापर्यंत जाते; व पुढे ती दक्षिणेस एन-तप्पूहाच्या लोकवस्तीपर्यंत जाऊन पोहचते. |
८ |
तप्पूहाचा टापू मनश्शेचा होता; पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पूहा हे एफ्राइमाचे होते. |
९ |
तेथून ती सीमा काना ओहोळापर्यंत उतरून त्याच्या दक्षिणेस पोहचते; तेथील मनश्शेच्या प्रांतांतील काही नगरे एफ्राइमाची होती; आणखी मनश्शेची सीमा त्या ओहोळाच्या उत्तरेस जाऊन समुद्राला मिळते. |
१० |
दक्षिणेकडील प्रदेश एफ्राइमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे. |
११ |
इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे. |
१२ |
पण ह्या नगरांच्या रहिवाशांना घालवून देणे मनश्शेच्या वंशजांना जमेना; त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला. |
१३ |
इस्राएल लोक समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कनानी लोकांना वेठबिगार करायला लावले. एकदमच हाकून दिले नाही. |
१४ |
योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, “परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तू आम्हांला वतनातला एकच वाटा का दिलास?” |
१५ |
यहोशवा त्यांना म्हणाला, “तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा.” |
१६ |
तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्यात राहणार्या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.” |
१७ |
यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यांना सांगितले, “तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हांला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही, |
१८ |
तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यहोशवा १७:1 |
यहोशवा १७:2 |
यहोशवा १७:3 |
यहोशवा १७:4 |
यहोशवा १७:5 |
यहोशवा १७:6 |
यहोशवा १७:7 |
यहोशवा १७:8 |
यहोशवा १७:9 |
यहोशवा १७:10 |
यहोशवा १७:11 |
यहोशवा १७:12 |
यहोशवा १७:13 |
यहोशवा १७:14 |
यहोशवा १७:15 |
यहोशवा १७:16 |
यहोशवा १७:17 |
यहोशवा १७:18 |
|
|
|
|
|
|
यहोशवा 1 / यहोशवा 1 |
यहोशवा 2 / यहोशवा 2 |
यहोशवा 3 / यहोशवा 3 |
यहोशवा 4 / यहोशवा 4 |
यहोशवा 5 / यहोशवा 5 |
यहोशवा 6 / यहोशवा 6 |
यहोशवा 7 / यहोशवा 7 |
यहोशवा 8 / यहोशवा 8 |
यहोशवा 9 / यहोशवा 9 |
यहोशवा 10 / यहोशवा 10 |
यहोशवा 11 / यहोशवा 11 |
यहोशवा 12 / यहोशवा 12 |
यहोशवा 13 / यहोशवा 13 |
यहोशवा 14 / यहोशवा 14 |
यहोशवा 15 / यहोशवा 15 |
यहोशवा 16 / यहोशवा 16 |
यहोशवा 17 / यहोशवा 17 |
यहोशवा 18 / यहोशवा 18 |
यहोशवा 19 / यहोशवा 19 |
यहोशवा 20 / यहोशवा 20 |
यहोशवा 21 / यहोशवा 21 |
यहोशवा 22 / यहोशवा 22 |
यहोशवा 23 / यहोशवा 23 |
यहोशवा 24 / यहोशवा 24 |